“सर्व गोष्टीत हातवर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. मतदार याद्यांवर त्याच्याबद्दलही चर्चा आहे. बोगस मतदार, मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आलं आहे. काही योजना सुरू केल्या, त्याची फसगत झाली. मग लाडकी बहीण योजना असेल. महत्त्वाचं काय आहे की निवडणूक जेवढी मोठी असेल वाद थोडे कमी होतात. निवडणूक छोटी असेल मतदारसंघाच्या अनुषंगाने. मतदारसंघ छोटा होतो तसतशी स्पर्धा वाढते” असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची महामुलाखत घेतली आहे.
“आघाडीत दोन तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते. युतीतही होत होती. महाविकास आघाडी म्हणून पहिली निवडणूक लढली ती लोकसभा. आपण जिंकलेले मतदारसंघ सोडले. विधानसभेत शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जनतेला वाटलं यांच्यात आताच खेचाखेची आहे, तर नंतर काय?” असं मत विधानसभा निवडणुकीतील पराभवावर उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.“लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हतं. ही तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही” असं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबद्दल सूचक वक्तव्य केलं.
‘हा आपल्यातून मी पणा आला तेव्हा पराभव झाला’
“समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेचं यश सर्वांच्या डोक्यात गेलं. लोकसभेत महाविकास आघाडीत नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत तू तर तू आपल्याला जिंकायचं आहे, हा आपलेपणा होता. विधानसभेत नाही नाही मला जिंकायचं आहे. हा आपल्यातून मी पणा आला तेव्हा पराभव झाला” असं पराभवाच विश्लेषण करताना उद्धव ठाकरे म्हणाले.
‘कोणीही न मागता मी दिलं’
“त्याचबरोबर ज्या तांत्रिक बाबी होत्या, त्यांनी योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती कुठे करत आहेत. मीच मुख्यमंत्री असा होतो कुणीही न मागता दिलं. माझं मुख्यमंत्री म्हणून एकच अधिवेशन झालं पहिलं. तेव्हा आम्ही सात मंत्री होतो. मी कोणीही न मागता दोन लाखापर्यंतचं पीक कर्ज मी माफ केलं होतं. त्यानंतर जो नियमित कर्ज फेड करतो. त्याला ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर राशी देणार होतो. दुर्देवाने कोरोनामुळे देऊ शकलो नाही. नंतर सुरुवात केली आणि सरकार पाडलं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.