कोल्हापूर :- एसपी ऑफिसमधील हेड क्लार्कने पोलिसाकडूनच बदलीसाठी घेतले ३० हजार, महिला कॉन्स्टेबल सूत्रधार; एकाला अटक
गौरव डोंगरे : कोल्हापूर आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून ३० हजारांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी पोलीस मुख्यालयातील हेड क्लार्कसह, महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मारुती पानकर (रा. कसबा बावडा) याला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. तर महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रितेश मनोहर ढहाळे यांनी २३ जुलैला धनश्री जगताप हिला ऑनलाइन पैसे पाठवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
यातील फिर्यादी हे कोल्हापर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी वडीलांच्या आजारपणामुळे आंतर जिल्हा बदली करीता अर्ज दिलेला होता. हा अर्ज हेड क्लार्क पानकर याच्याकडे आला होता. त्याने फिर्यादीला फोन करुन आंतर जिल्हा बदलीवर जायचे असेल तर ३० हजार रुपये दयावे लागतील अन्यथा तुझी बदली होणार नाही अशी भिती घातली. तसेच बदलीसाठी ३० हजार रुपये देणेस भाग पाडले. रक्कम महिला कॉन्स्टेबल जगताप हिच्याकडून ऑनलाईन स्विकारल्याची फिर्याद दिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.