Breaking News! सांगलीत भरदिवसा खून:, खुनाचे सत्र सुरूच
सांगली - जिल्ह्यात खुनाचा सत्र असून बारा तासांनी पुन्हा एकाचा खून बुधगाव (ता. मिरज) येथे झाले. बुधगावमधील झेंडा चौकात मित्राचा चाकूने भोसकून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काल रात्री ही देवराष्ट्रे (ता.कडेगाव) येथे पुर्वीच्याच वादातून खून झाला. आजही याच शुल्लक कारणातून खून झाला असन खुनाच्या मालिकेने जिल्हा हदरला आहे.
बुधगाव येथील झेंडा चौकात सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. सिकंदर मौला शिकलगार (वय ५२, बुधगाव) असे मृताचे नाव आहे. संशयित मित्र रफिक मेहबुब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत. शिकलगार हे सेंट्रींगचे काम करत होते. तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजूरीचे काम करत होता. एका मुकादमाने बुधगाव येथील आरसीसी चेंबरचे काम शिकलगार यास दिले होते.
त्यामुळे शिकलगार याने पट्टेकरी याला सोबत घेवून काम करण्यास सुरूवात केली. दरम्यानच्या काळात पट्टेकरी याने दुसऱ्याकडे कामला गेला. यातून दोघांत काल रात्री वादावादी झाली. या वादात शिकलगार याने पट्टेकरी यास मारहाण केली. त्या मारहाणीचा राग पट्टेकरी याच्या डोक्यात होता.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास पट्टेकरी हा धारधार चाकू घेवून धुंद अवस्थेत झेंडा चौकात आला. त्याठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार याच्याशी वादावादी झाली. याच वादातून पट्टेकरी याने चाकूने शिकलगार यास भोसकले. झातीवर वर्मी वार झाल्याने शिकलगार हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला.
त्याठिकाणी पट्टेकरी चाकू घेऊन तसाच उभा होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शिकलगार यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी पट्टेकरी यास तत्काळ ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक विमला एम., निरीक्षक किरण चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मृत शिकलगार याचे नातेवाईक शब्बीर रसुल शिकलगार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुर्वी झाली होती मारामारी
काही वर्षापुर्वी संशयित पट्टेकरी याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्यावेळी गुन्हा नोंद करण्यात आला होता. तर पट्टेकरी यानेही मारहाण केल्याचा गुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे. पोलिस निरीक्षक किरण चौगुले अधिक तपास करत आहेत.
सहा महिन्यांत ३४ खून
दरम्यान, जिल्ह्यात एका पाठोपाठ एक खुनाच्या घटाना घडत असून जिल्हा हदरला आहे. गेल्या सहा महिन्यांतील ३४ खून झाले असून कायदा, सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.