कोल्हापूर :-'कंत्राटदार हर्षलसारखी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका'
अतिरिक्त आयुक्तांपासून क्लार्कपर्यंत सगळ्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार
पैसे दिले, कंत्राटदार श्रीप्रसाद वराळेंचा गंभीर आरोप
कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचाराची बरबटलेली यंत्रणा किती खोलवर रुजली गेली आहे. याचा पुरावाच देणारा आरोप मनपा कंत्राटदार श्रीप्रसाद वराळे यांनी केला आहे. श्रीप्रसाद वराळे यांच्यावर काम न करताच
85 लाखांची बिल उचलण्याचा आरोप आहे. हा आरोप शिवसेना शिंदे गटाचे संघटक
सत्यजित कदम यांनी आरोप केला होता. मात्र, वराळे यांनी गंभीर आरोपांची
मालिका करताना अतिरिक्त आयुक्तांपासून ते क्लार्कपर्यंत बिल काढून
घेण्यासाठी कोणाला किती टक्के दिले? याचं रेट कार्ड समोर आणून खळबळ उडून
दिली आहे. वराळे यांनी शुक्रवारी स्वतःच निवेदन देत याबाबतची माहिती दिली.
त्यामुळे महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणा किती खोलवर आहे याचाच पुरावा समोर
आला. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर होणारा टक्केवारीचा आरोप नवीन नसला, तरी
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कोणाला किती टक्क्यांमध्ये, किती रोखीमध्ये
पैसा पुरवण्यात आला याचा भांडाफोड पहिल्यांदाच एखाद्या कंत्राटदाराच्या
माध्यमातून करण्यात आला आहे.
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्यासारखी माझ्यावर वेळ येऊ देऊ नका
या
सर्व पार्श्वभूमीवर श्रीप्रसाद वराळे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी त्यांनी आपली व्यथा मांडली. कंत्राटदार हर्षल
पाटील यांच्यासारखी माझ्यावर वेळ येऊ देऊ नका, असे ते म्हणाले. पैसे न
घेताच काम न करताच पैसे उचलल्याचा आरोपात वराळेंविरोधात फौजदारी गुन्हे
दाखल करण्याचे आदेश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. दरम्यान, ते
म्हणाले की प्रत्येक कामासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार
पैसे द्यावे लागतात. पैसे दिल्याशिवाय कोणतेही बिल मंजूर केलं जात नसल्याचे
ते म्हणाले. इतकेच नव्हे तर अतिरिक्त आयुक्तांपासून ते क्लार्कपर्यंत
सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या टक्केवारीनुसार पैसे दिले गेल्याचे त्यांनी
सांगितलं. हे सर्व सगळे आपले पुरावे माझ्याकडे असल्यास ते म्हणाले.
त्यामुळे काम न करता मी पैसे उचलल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे तो
योग्य नसून मी कोणतेही चुकीचे काम केलं नसल्याचा दावा वराळे यांनी केला.
माझ्याकडून
कोणत्या अधिकाऱ्यांनी किती पैसे घेतले याची यादी मी पत्राच्या माध्यमातून
मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितलं., त्यामुळे मला आता न्याय
मिळावा अशी विनंती महापालिकेचे ठेकेदार वराळे यांनी केली आहे. प्रसाद
वराळे यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना किती टक्के लाज दिली, त्यांची
पैशाची भूक कशा पद्धतीने भागवली याचा लेखाजोखा एबीपी माझा समोर बोलताना
मांडला.
कोणाला किती रोखीत दिले? याचाच पुरावा कंत्राटदाराने दिला
दरम्यान, वराळे यांनी दिलेल्या निवदेनात मोठा सनसनाटी दावा केला आहे. ते म्हणाले की, माझ्या नावे मंजूर असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या प्रभाग क्रमांक दोन कसबा बावडा पूर्व बाजू अंतर्गत जाधव घर ते बडबडे मळा ड्रेनेज पाईपलाईन टाकणे, सदर कामातील पाचवे रनिंग बिल 85 लाख रुपये घेतले असा आरोप करण्यात आला आहे. परंतु, सदर पाचवे बिल रक्कम जीएसटीसोबत 72 लाख 16 हजार 396 रुपये 50 पैसे इतकी होती. ती माझ्या महानगरपालिकेमधील नोंदणीकृत युनियन बँक चालू खाते क्रमांक 471101010280337 या खात्यावर दिनांक 24-12 -2014 रोजी सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटे 6 सेकंदाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या खात्यावरून 67 लाख 58 हजार तीन रुपये इतकी रक्कम माझ्या खात्यावर जमा झाली. सदर कामाच्या बिलासाठी मी महापालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना 2 टक्के प्रमाणे 1 लाख २० हजार रोख, उपशहर अभियंता कांबळे साहेबांना 1 टक्के प्रमाणे 60 हजार रोख , शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना शासन अनुदान असल्यामुळे दोन टक्के याप्रमाणे 1 लाख 20 हजार रोख महापालिकेमध्ये दिले.त्यांनी पुढे म्हटले आहे की, अकाउंट विभागामधील क्लार्क नाईक साहेब, अधीक्षक सूर्यवंशी साहेब, यांना प्रत्येकी लाखाला 100 याप्रमाणे प्रत्येकी 6 हजार बिलावर सही करताना दिले. ऑडिट विभागामधील क्लार्क यांना लाखाला 100 तसेच लेखापरीक्षक परीट मॅडम यांना लाखाला 200 व मुख्य लेखा परीक्षक मिसाळ मॅडम यांना लाखाला 200 अशा पकारे एकूण 30 हजार रुपये प्रत्येक सही करताना सोबत विभागांमध्ये दिले. तसेच ॲडिशनल कमिशनर रोकडे साहेब यांना 1 टक्के 60 हजार रुपये दिले .सदर बिल मिळण्याकरिता जी शासन नियमावली आहेत त्या पद्धतीनेच मला मिळालं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.