सांगली, दि. २६ जुलै २०२५: भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सांगली पश्चिम मंडल कार्यकारिणीची घोषणा आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आली. या वेळी नवीन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, तसेच गटनेत्या भारती दिगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटके व उत्साही झाले असून, यामध्ये सांगली पश्चिम मंडलातील नविन नेतृत्वाला संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. भाजपा पक्षशिस्त, कामाची पारदर्शकता व जनतेशी थेट संपर्क या गोष्टींना महत्व देणाऱ्या कार्यपद्धतीला अनुसरून ही कार्यकारिणी रचण्यात आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी नविन कार्यकारिणीला शुभेच्छा देताना सांगितले, “संघटन हेच भाजपाचे खरे बळ असून प्रत्येक पदाधिकारीने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून जनतेच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा.”राज्य परिषद सदस्य श्री प्रकाश बिरजे यांनी सांगितले की, “नविन नेतृत्वातून पक्षात नवे ऊर्जा संचारेल व सांगली पश्चिम भागात भाजपाचे अजून मजबूत जाळे तयार होईल.” भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार यांनी सांगितले की, “कृषी व शेतकरी कल्याणासोबत सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारी संघटना म्हणून ही टीम काम करेल.”या नविन कार्यकारिणीच्या माध्यमातून सांगली पश्चिम परिसरात पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल. पक्षाचे धोरण, सरकारच्या योजना, आणि केंद्र व राज्यातील नेतृत्वाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट या नव्या टीमने घेतले आहे. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ , भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील मोहन मोहन वाटवे, गटनेत्या भारती दिगडे, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मोहन वाटवे, भाजपा अनुसूचित जाती प्रदेश सचिव प्रदीप कांबळे, सांगली पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, विजय साळुंखे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.