मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत
“महारक्तदान संकल्प” सांगली विधानसभा मतदारसंघात मंडलनिहाय रक्तदान
शिबिरे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने “महारक्तदान संकल्प” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांगली विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मंडलनिहाय रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना आणि नियोजन सांगलीचे आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे रक्तदानाबाबत जनजागृती करणे, समाजात सकारात्मक भावना निर्माण करणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे होय.
🔸 शिबिरे भरविण्यात आलेली ठिकाणे:
• मेनन सांस्कृतिक हॉल, अभयनगर, सांगली• महादेव मंदिर, बुधगाव• किसान चौक, गणपती मंदिर, सांगली• माळी मंगल कार्यालय, कुपवाड• गणेश मंगल कार्यालय, मारुती चौक, सांगलीया शिबिरांना नागरिक, युवक वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रक्तदात्यांची लक्षणीय उपस्थिती होती.रक्तपेढ्यांचे सहकार्य, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण शिबिरांचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले गेले.या उपक्रमाबाबत आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,“रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवणं ही काळाची गरज आहे. सांगलीकरांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.”
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस राजू आवटी, विश्वजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोसले, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे,मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, संतोष सरगर, कृष्णा राठोड, अमित देसाई, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते, स्मिता पवार, जिल्हा सचिव उदय मुळे, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, विनायक सिंहासने, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेवक सुबराव मद्रासी, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेविका अप्सरा वायदंडे, सविता मदने, सोनाली सागरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष जयवंत पाटील, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव प्रदीप कांबळे, माजी सभापती विक्रम पाटील, भूपाल सरगर, दरिबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, रवींद्र ढगे, अश्विनी तारळेकर, रूपाली अडसूळ, चेतन माडगूळकर, रवींद्र सदामते, नवनाथ खिलारे, अमित गडदे, कृष्णा खांडेकर, प्रशांत राठोड, शुभम देसाई, प्रीती काळे, शैलजा राज कोळी, धनाजी पाटील, सुहास कलगुडघी, विजय साळुंखे, उदय बेलवलकर, संदीप कुकडे, विजय कडणे, राजू जावळीकर, स्मिता भाटकर, शुभम चव्हाण, अनिकेत खिलारे, मोहन जामदार, स्नेहजा जगताप आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. हा सामाजिक उपक्रम यशस्वी ठरून सांगलीकरांच्या सहभागातून मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाला सामाजिक मूल्यांची जोड लाभली आहे. या माध्यमातून “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला बळकटी मिळाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.