तुमच्या अश्लील कृत्यांची सीडी माझ्याकडे आहे, असे प्रफुल्ल लोढाने सांगितल्यानंतर गिरीश महाजनांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर महाजनांनी मुंबईच्या एका हॉटेलात तीन महिने लोढाचे पाय चेपले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज केला. हे सगळं लोढानेच मला सांगितल्याचे खडसे म्हणाले. लोढाने मला गुलाबांचा बुकेच दिला नाही तर गिरीश महाजनांच्या गुलाबी गोष्टीदेखील सांगितल्या होत्या. लोढा आणि मी एकाच गाडीतून प्रवास केला तेव्हा ज्या गप्पा झाल्या त्या महाजनांचे कारनामे उघड करणाऱ्या होत्या, असे खडसे यांनी नमूद केले. गिरीश महाजन यांनी जो माझा फोटो पोस्ट
केला तो बोलका नाही तर बोलके फोटो माझ्याकडे आहेत. तुम्ही गुलाबी गोष्टी
ज्यांच्यासोबत केल्या त्याचे अनेक फोटो मी देऊ शकतो. योग्य वेळ येऊ द्या,
असा इशाराच खडसेंनी महाजनांना दिला.
ते फडणवीसांचे पाय चाटतात!
गिरीश महाजन देवाभाऊचे पाय चाटतात. त्यांच्या मागेपुढे फिरतात. दिल्लीत झुकतात, ते आमच्या रक्तात नाही, असे खडसेंनी खडसावले. जोपर्यंत मी भाजपात आणि मंत्रिमंडळात होतो तोपर्यंत महाजनांना मंत्रिमंडळात स्थान नव्हतं. त्यांनी माझ्याविरुद्ध कारस्थाने केली. त्यांच्यासोबतच्या वादामुळे मला पक्षाबाहेर जावे लागले, असे खडसे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.