BAMU चा मोठा निर्णय..! चंद्रकांत पाटील, सुळे, मुंडे यांच्या शिक्षण संस्थांसह 113 महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने भौतिक सुविधांच्या अभावामुळे आणि बोगस प्रक्रियांमुळे चार जिल्ह्यांतील 113 नामांकित महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यामध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, बसवराज पाटील आणि मधुकर चव्हाण यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीने केलेल्या तपासणीत प्राध्यापकांच्या बोगस नियुक्त्या, वेतन न देणे आणि बायोमेट्रिक हजेरीसह अन्य सुविधांचा अभाव आढळून आला. हा निर्णय 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी लागू आहे. विद्यापीठाच्या विद्यापरिषद आणि व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतला होता. NAAC मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी आवश्यक सुविधा आणि प्राध्यापक नियुक्त्यांचे निकष पूर्ण केले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने कठोर पाऊल उचलत 113 महाविद्यालयांचे प्रवेश बंद केले.
जिल्हानिहाय प्रवेश थांबवलेली महाविद्यालये
छत्रपती संभाजीनगर: 79
जालना: 40
बीड: 44
धाराशिव: 24
प्रवेश थांबवलेल्या प्रमुख शिक्षण संस्था
हरिभाऊ बागडे: संत सावतामाळी महाविद्यालय, फुलंब्रीचंद्रकांत पाटील: आर.पी. महाविद्यालय, धाराशिवपंकजा मुंडे, धनंजय मुंडे: वैजनाथ महाविद्यालय, परळीरावसाहेब दानवे: मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदनसुप्रिया सुळे: मौलाना आजाद शिक्षण संस्था, कासेलसतीश चव्हाण, प्रकाश साळुंके: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 5 महाविद्यालयेराजेश टोपे: मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालनाजयदत्त क्षीरसागर: आदर्श शिक्षण संस्था, बीडबसवराज पाटील: माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुमराणा जगजीतसिंह: तेरणा महाविद्यालय, धाराशिवमधुकर चव्हाण: नळदुर्ग महाविद्यालय, धाराशिव
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.