Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :-'लव्ह, सेक्स अन् धोका!' अर्धवट सेक्सने बिनसलं; कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

पुणे :-'लव्ह, सेक्स अन् धोका!' अर्धवट सेक्सने बिनसलं; कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

या प्रकरणात तरुणीनेच खोटी तक्रार दिली असून, ‘लव्ह, सेक्स अन् धोका’ अशा ट्रायअँगलचा हा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

25 वर्षीय पीडित तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती की, एका अज्ञात डिलिव्हरी बॉयने तिच्यावर जबरदस्ती केली. मात्र, तपास सुरू होताच खरी कहाणी उघडकीस आली. तरुणी आणि आरोपी गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाचे होते.

घटनेच्या दिवशी तरुणीचा भाऊ घरी नसताना तिचा प्रियकर कुरिअर बॉय असल्याचे सांगून फ्लॅटमध्ये शिरला. त्याने शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. मात्र, मासिक पाळीचे कारण देत तरुणीने नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि अर्धवट संबंध झाले. त्यानंतर तरुणाने सेल्फी काढून फ्लॅटमधून निघून गेला.

पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर या प्रकरणातील  ‘लव्ह, सेक्स अन् धोका’ हा ट्रायअँगल समोर आला. तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत असलेला तरुण गेल्या दीड वर्षांपासून मित्र आहेत. इतकेच नाही, तर दोघांचे कुटुंबीयही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. तरुण अनेकदा तरुणी घरी एकटी असताना तिच्या घरी जायचा. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडे आपली खरी ओळख उघड होऊ नये म्हणून, त्याने प्रत्येक वेळी ‘कुरिअर बॉय’ असल्याचे सांगायचे आणि तरुणीही फोन आल्यावर त्यास दुजोरा द्यायची, असे तपासात उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल २०० पोलिसांची पथके कार्यरत होती. शेकडो सीसीटीव्ही फुटेज, हजारो कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. तरुणीने घडलेला प्रकार लपवण्यासाठी मोबाईल व लॅपटॉपमधील डेटा डिलीट केला. तिने तक्रारीत थेट नाव न घेता एका अनोळखी कुरिअर बॉयवर बलात्काराचा आरोप केला. पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड तपासून ही तक्रार बनावट असल्याचे सिद्ध केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.