Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया सारखे गुंतवणूकदारही या वादात उडी घेत आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे जाहीर केले आहे की ते मराठी शिकणार नाहीत.

यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. या सगळ्या घटनेनंतर त्यांनी आता संरक्षण मागितले आहे.

ट्विटरवर ठाकरेंना टॅग करत केडिया यांनी लिहिले की, "मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही. तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी वचन दिले आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे?" मीरा रोड येथील एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही दिवसांनी केडिया यांचे हे विधान आले आहे.

यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावर त्यांनी जहरी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना मनसे नेते मनोज चव्हाण म्हणाले की, राजकारणात ज्या गोष्टी सुरू आहेत त्यामध्ये मराठी विषय, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर बोललं की फेमस होतं. भाषेवर कोणी काही बोलत असेल तर त्यांच्या कानफटात बसणार. महाराष्ट्रात मराठीच चालणार. ज्याला कुणाला येत नसेल त्यांनी आम्ही मराठी भाषेत शिकून घेऊ, मराठी शिकायचेच नाही. काय करायचं असेल ते करून घ्या. यापुढे कानाखाली जाळच काढल्या जाईल. सुशील केडिया कोण आहे? पाच तारखेचा झाल्यानंतर निश्चितपणे त्याला काय करायचं ते करू. त्यांनी त्याचे ॲक्शन केले. आता आमची रिएक्शन करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.

सुशील केडिया यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांना धमकी आणि फोन येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांकडे सरंक्षण मागितले आहे. याबाबत त्यांनी अजून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी धमकीचा फोन येत असल्याचे सांगितले. तसेच यात अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

या घटनेवर अनेक तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, 'महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावेच लागेल. जर तुम्हाला मराठी येत नसेल, तर तुमचा दृष्टिकोन असा नसावा की तुम्ही मराठी बोलणार नाही. जर महाराष्ट्रात कोणी मराठीचा अपमान केला तर आम्ही आमचे कायदे लागू करू.' कदम यांनी हिंसाचाराचा निषेध केला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी होती असे म्हटले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.