Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहिला मुलगा पण नंतर दोन जुळ्या मुली, अनुकंपावर लागण्यासाठी जन्मदाता बाप खालच्या थराला, बायकोला...

पहिला मुलगा पण नंतर दोन जुळ्या मुली, अनुकंपावर लागण्यासाठी जन्मदाता बाप खालच्या थराला, बायकोला...
 

नांदेड : शासकीय नोकरीसाठी बापाने पोटच्या मुलीची एका पुजाऱ्याला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादानंतर घर सोडून गेलेल्या पत्नीने तब्बल आठ वर्षानंतर एनजीओच्या मदतीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात पतीसह पुजाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडमधील सुरेखा यांचा २००९ मध्ये गजानन वांजरखेडे याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली झाल्या. गजानन यांचे वडील विनायकराव वांजरखेडे यांना शासकीय नोकरी होती. २०११ मध्ये त्यांचं निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना २०१८ मध्ये अनुकंपा तत्वावर हिंगोली येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात शिपाई पदी नोकरी लागणार होती. पण तीन अपत्य असल्यामुळे आपल्याला नोकरी लागणार नाही अशी भीती मुलीच्या वडिलांना होती. दरम्यान २०१८ मध्ये गजानन वांजरखेडे यांनी नातेवाईक देविदास जोशी यांना मुलबाळ नसल्याने एक मुलगी विकत देवूया, असे पत्नीला म्हणाले यावरून पती पत्नीत वाद झाला. याच वादातुन गजानन यांनी पत्नीला घराबाहेर हाकलून दिले. तर तिन्ही मुले वडिलांकडे होती.

दरम्यान घराबाहेर हाकलून दिल्यानंतर पीडित महिला धुनी भांडी करून उदरनिर्वाह करायची. तब्बल सात वर्ष महिला पती पासून विभक्त होती. दुसरीकडे बापाने मुलीला नातेवाईक असलेल्या पुजाऱ्याला विक्री केली. गजानन हे हिंगोली येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात कार्यरत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलीला एका नातेवाईकांना दिल्याची माहिती महिलेला समजली. त्यानंतर सुरेखा यांनी एका एनजीओच्या मदतीने मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते. एनजीओकडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी अखेर भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 
 
पैशाच्या लालसेपोटी माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप महिलेने केला आहे. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मुलीचा सांभाळ करणाऱ्या जोशी दाम्पत्याकडे मुलगी दत्तक घेतल्याचा कुठलाच पुरावा आढळून आला नाहीये. त्यामुळे भाग्यनगर पोलीसांनी पती गजानन वांजरखेडे आणि देविदास जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नोकरीसाठी पोटच्या मुलीची बापानेच विक्री केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.