सांगलीत दिशा समिती बैठक पार पडली. यावेळी अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. त्यांनी खासदार निधी आणि त्यात पडणाऱ्या ढपल्यावरून खडे बोल सुनावत निधी वाटपात भ्रष्टाचार करायचा असेल तर, आताच दुसरा जिल्हा शोधा, असा दमच अधिकाऱ्यांना भरला आहे. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) सभा झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी, 'संसदेत आवाज उठवून निधी आम्ही मिळवतो. तो निधी आमचा असतो. पण तो वितरीत करताना वर्क ऑर्डरसाठी तुम्ही दोन टक्के का मागता? असा सवाल करत थेट अधिकाऱ्यांवर आरोप केला. तसेच भ्रष्टाचारच करायचा असेल तर सांगली नको, तुम्हीच दुसरा जिल्हा शोधा. तुमच्या टक्केवारीच्या नादात विकासकामांना विलंब होत आहे. निधी खर्च न झाल्याने खासदार म्हणून माझी कामगिरी कमी दिसतेय असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.या आरोपांवेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित असतानाही कुणी 'ब्र' काढला नाही. केंद्र शासनाच्या विशेष निधीतून हवा शुद्ध करणारी अत्याधुनिक यंत्रणा महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बसवण्यात आली. ही यंत्रणा बसवून वर्ष उलटले तरी ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. याबाबत लोकप्रतिनिधींनी सवाल उपस्थित केला. याबाबत उत्तर देताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, 'महावितरण कंपनीकडून विद्युत जोडणी होत नसल्याने ही यंत्र वर्षभरापासून बंद आहेत.'
शासकीय गोदामांचा शेतकऱ्यांना वापर झाला पाहिजे, अशी भूमिका खासदारांनी घेत विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणला. काही दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीला हे गोदाम भाडेपट्टीवर देण्यात आले, मग मार्केट यार्डात येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल ठेवायचा कुठे? त्यांना कमी पैशांत सुरक्षेची हमी देत, कमी दरामध्ये गोदाम उपलब्ध करून देण्याचा दम पाटील यांनी दिला.
शहरातील कचराप्रश्नी दोन्ही 'दादा' आक्रमक
'समडोळी आणि बेडग येथील घनकचरा प्रकल्पात महापालिका क्षेत्रातील रोज 180 टन ओला आणि सुका कचरा नेला जातो. यावर महिन्याला 40 लाख रुपये खर्च होतात', असे आयुक्त गांधी यांनी सांगितले. यावर आमदार गाडगीळ यांनी 'शहरात स्वच्छतेचा अभाव आहे. बायपासला कचऱ्याचे ढीग पडतात. आपण नुसतेच 'स्वच्छ भारत अभियान' म्हणतो, काम काहीच दिसत नाही', असे सुनावले. यावर खासदार पाटील यांनी देखील 'रोज 180 टन कचरा उचलता तरीही शहर अस्वच्छ कसे?' असा सवाल करताना योग्य कारवाई करा असे सुनावले.1. खासदार विशाल पाटील यांनी कोणत्या प्रसंगी इशारा दिला?- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेताना त्यांनी हा इशारा दिला.2. त्यांनी नेमकं काय म्हटलं?- "खासदार निधी वाटपात भ्रष्टाचार करायचा असेल तर दुसरा जिल्हा शोधा", असा थेट इशारा अधिकाऱ्यांना दिला.3. या इशाऱ्याचे परिणाम काय होऊ शकतात?- प्रशासनात पारदर्शकता वाढण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांमध्ये दक्षता व जबाबदारी निर्माण होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.