रिअल इस्टेटचा व्यवसाय, स्वत:ची ट्रॅव्हल कंपनी; पुण्यात रेव्ह पार्टीत सापडलेले एकनाथ खडसेंचे जावई कोण आहेत?
पुण्यात 26 जुलैच्या रात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीत झालेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. यामध्ये एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या हाऊस पार्टीतून खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या धाडीत दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आहे. ज्या रुममध्ये हा छापा टाकण्यात आला ते प्रांजल खेवलकर याच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे.
कोण आहे डॉ. प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर बालपणीचा मित्र प्रांजल यांच्याशी रोहिणी खडसे यांनी विवाह केला. खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. पत्नी रोहिणी खडसे या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र पती प्रांजल राजकारणापासून दूर आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.
सोनाटा लिमोझिन कारमुळेही होते चर्चेत...
एकनाथ
खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यापूर्वी कारमुळेही चर्चेत आले होते. या
कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या
अंजली दमानिया यांनी केला होता. या कारची नोंदणी जळगाव आरटीओमध्ये झाली
होती. मात्र या कारची नोंदणी हलक्या वाहनांच्या श्रेणीत करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.