भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण असले तरी, नुकतीच एक आश्चर्यजनक गोष्ट समोर आली आहे. पाकिस्तानमधील सामान्य लोक भारताला कोणत्या नावाने संबोधतात? त्यांच्या भाषेत भारताचा उल्लेख ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते, कारण यामध्ये केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक भावनाही दडलेल्या असतात. भारताला ऐतिहासिकदृष्ट्या अनेक नावांनी
ओळखले जाते.जसे की जंबुद्वीप, आर्यावर्त, भारतखंड आणि हिंदुस्तान. प्रत्येक
नावामागे इतिहास आणि परंपरेची एक विशिष्ट कहाणी दडलेली आहे. मात्र
पाकिस्तानमधील नागरिक भारताला कोणत्या नावाने संबोधतात, हे जाणून घेणे
औत्सुक्याचे ठरते.
पाकिस्तानी लोक भारताला काय म्हणतात?
पाकिस्तानमधील बहुतांश सामान्य नागरिक अजूनही भारताला ‘हिंदुस्तान’ म्हणतात. हे नाव केवळ राजकीय नाही, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जाते. विशेषतः जुन्या पिढीतील लोकांमध्ये या नावाचा वापर अधिक दिसून येतो. ते भारताच्या प्राचीन संस्कृतीशी आणि बहुसंख्य हिंदू लोकसंख्येशी जोडलेले आहे. पाकिस्तानी तरुण, विशेषतः सोशल मीडियावर किंवा क्रिकेट वर्ल्ड कपसारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये, भारताला थेट ‘भारत’ म्हणून संबोधतात. हे जागतिक स्तरावर भारताची आधुनिक ओळख दर्शवते. पाकिस्तानी सरकारी दस्तऐवज आणि न्यूज चॅनेल्समध्ये मात्र ‘भारत’ हेच नाव वापरले जाते. हे नाव अधिक औपचारिक मानले जाते आणि द्विपक्षीय नात्यांतील मर्यादा जपणारेही मानले जाते.
पाकिस्तानचा भारतबद्दल दृष्टिकोण
भारताविषयी
पाकिस्तानमधील भावना दोन टोकांवर विभागलेल्या आहेत. एक गट भारताला शत्रू
मानतो, तर दुसरा गट भारताच्या विकास मॉडेलचे कौतुक करतो. अनेक पाकिस्तानी
तरुण भारताच्या IT, सिनेमा, स्टार्टअप्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील
प्रगतीकडे प्रेरणादायक दृष्टीने पाहतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.