Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथ शिंदेंना पक्षांतर्गत मिळणार टक्कर? महिनाअखेर होणार निवडणूक!

एकनाथ शिंदेंना पक्षांतर्गत मिळणार टक्कर? महिनाअखेर होणार निवडणूक!


एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत निवडणूक होत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तब्बल 22 वर्षानंतर शिवसेनेअंतर्गत निवडणुका होत आहेत.

विशेष म्हणजे मुख्यनेते या पदासाठी एकनाथ शिंदे यांना देखील निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत कोणी आव्हान देणार का? याची चर्चा सुरू आहे.

महिनाअखेरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेअंतर्गत निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही निवडणुकीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सक्रीय कार्यकर्त्यांना या निवडणुकीत सहभाग होता येणार आहे.


ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदानाद्वारे शिवसेना सदस्य पदाधिकारी निवडणार आहेत. यामध्ये गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभागप्रमुख, विभाग समन्वयक, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, शिवेसना उपनेता, मुख्यनेता, लोकधिकार समितीचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत

एकनाथ शिंदे होणार पक्षप्रमुख?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंने आपल्याकडे पक्षप्रमुख हे पद न घेता मुख्यनेता हे पद घेतले. पक्षाचा कारभार ते पक्षनेते म्हणून पाहतात. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुखपद आपल्याकडे घ्यावे यासाठी आग्रह धरला. मात्र शिंदेंनी सांगितले की काही पदाधिकारी म्हणता की शिवसेनाप्रमुख तर काही म्हणतात शिवसेना 'राष्ट्रीय प्रमुख'. त्यामुळे माझ्या पदाबाबत निर्णय पुढील बैठकीत घेऊ.

सात टप्प्यात होणार निवडणूक

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच शिवसेनेत अंतर्गत निवडणूक होणार आहे. ही निवडणूक सात टप्प्यात होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे सदस्य या निवडणूक मतदान करू शकतील. या निवडणुकीमुळे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि मोठी संधी मिळेल, असे सांगितले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.