Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-जाहीर इशारा तमाम लोकांचे माहितीकरिता इशारा देण्यात येत आहे की,

सांगली :-जाहीर इशारा तमाम लोकांचे माहितीकरिता इशारा देण्यात येत आहे की,



मिळकतीचे वर्णन : सांगली म्युनिसिपल हद्दीतील, बापट मळा येथील सि.स.नंबर ३३१/अ/२ या जमिनीमधील १४५४७.०० चौ.मी. क्षेत्राची जमीन मिळकत ही कै. श्री. दामोदर रामचंद्र बापट क्रीडा प्रतिष्ठान सांगली तालुका मिरज, जिल्हा सांगली ट्रस्ट नोंदणी क्रमांक ई/५२१/सांगली या न्यासाला सन १९८५ मध्ये नोंदणीकृत बक्षीस पत्राने कब्जामध्ये मिळालेली जमीन आहे. सदर मिळकत ट्रस्टचे पीटीआर उतारेस नोंद आहे. अशी वस्तुस्थिती असताना सदर ट्रस्ट मिळकतीमध्ये सिद्धिविनायक प्लॅटिनम भागीदार फर्मतर्फे भागीदार अ) श्री. प्रमोद दत्तात्रय शिंदे ब) श्री. नीरज विजय नावंदर यांनी बेकायदेशीरपणे इमारत विकसनाचे काम सुरू केले आहे. सदर बेकायदेशीर इमारत विकसनास मनाई मिळण्यासाठी आमचे अशिलांनी माननीय धर्मादाय सह आयुक्तसो, कोल्हापूर यांचे कोर्टात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ ई अन्वये अर्ज क्रमांक ०२/२०२४ चा दावा दाखल केला आहे. लोकांना याबाबत सूचित करण्यात येते की, वर नमूद मिळकत ही ट्रस्टचे मालकी वहिवाटीची मिळकत असलेने त्याचे मा. धर्मादाय सह आयुक्तसो, कोल्हापूर यांचे पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरण झाले असल्याने त्यामध्ये होणारे व होत असलेले इमारत बांधकाम पूर्णतः चुकीचे बेकायदेशीर आहे. तरी कोणीही सदर ट्रस्ट मिळकतीसंदर्भाने कोणीही, कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. म्हणून दिला जाहीर इशारा असे. तारीख २२/०७/२०२५

श्री. प्रवीण प्रकाश कदम, अॅडव्होकेट

बी.एस.एल., एलएल.बी. (स्पे.)

'ध्रुव' जी-१, शिवसिद्धी, गोसावी कॉम्प्लेक्स, सि.स.नं. २३६३, सी वॉर्ड, शनिवार पेठ, कोल्हापूर. मोबा. ९८२२२९४२४४ 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.