Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाल्यानंतर जयंत पाटलांची तळपायाची आग मस्तकात गेली : गोपीचंद पडळकर

इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाल्यानंतर जयंत पाटलांची तळपायाची आग मस्तकात गेली : गोपीचंद पडळकर
 

सांगली : इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर होत असल्याने जयंत पाटलांच्या तळपायातील आग मस्तकात गेली, त्यांचा संताप झाला असा दावा करत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली. काही लोकांना पुढे करून जयंत पाटलांनी ईश्वरपूर नावाला विरोध केल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढे हिंदूंना विरोध करणाऱ्यांना ठेचून काढू असा इशारा पडळकरांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटामध्ये भाजपकडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती.

काही लोकांची झोप उडाली
इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्यास मंजुरी देत तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि काही लोकांची झोप उडाली. मला न विचारता हे नाव कसे काय बदलले असे म्हणाऱ्या लोकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली असे पडळकर म्हणाले.
हिंदू विरोधी भूमिका घेतल्यास ठेचून काढू

इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यावर ज्यांना थेटपणे यावर विरोधात बोलता येत नाही त्यांनी काही लोकांना पुढे करून ईश्वरपूर नावाला विरोध करायचे काम सुरू केलं. पण इथून पुढे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्याना ठेचून काढू असा इशाराही पडळकर यांनी दिला. सांगली जिल्ह्यात येणाऱ्या खानापूर, सुलतानगादे या गावाची देखील लवकरच नावे बदलायची असून आता सुलतान वगैरे इथे चालणार नाही. या गावातील लोकांनी जे नाव बदलायचे ते नाव बैठक घेऊन ठरवा , आपण सरकारकडे तो प्रस्ताव पाठवू असेही पडळकर म्हणाले.

विधानभवनात मारामारी करणाऱ्याचे कौतुक
विधानभवन आवारात झालेल्या मारहाण प्रकारात नाव आलेल्या ऋषी उर्फ सर्जेराव टकलेचे कौतुक आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं. दुष्काळी भागाचे नाव कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते हे फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत असं म्हणत ऋषी उर्फ सर्जेराव टकलेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कौतुक केले. ऋषी उर्फ सर्जेराव टकले हा आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असून विधानभवनमध्ये झालेल्या मारहाण घटनेत टकलेचे नाव समोर आले. कलियुगातील संजयला स्वप्न पडतात आणि मंत्रिमंडळातील 6 मंत्र्याची विकेट उडणार अशा चर्चा होतात. पण हे सरकार भक्कम आहे असे म्हणत संजय राऊत आता फक्त कमोडवरच बसून मुलाखत द्यायची राहिलेय असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.