Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंडरवेअर इतर कपड्यांबरोबर धुतलं तर काय होतं माहितीये? कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का

अंडरवेअर इतर कपड्यांबरोबर धुतलं तर काय होतं माहितीये? कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का
 

आपण बहुतांश वेळा कपडे धुताना एक गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे योग्य कपडे वेगळे करून धुणं. एकाच वॉशिंग मशीनमध्ये आपण अंडरवेअर्स, टी-शर्ट, पायजमा, स्वेटर, स्वयंपाकघरातील टॉवेल्स असे सगळे कपडे एकत्र टाकतो. पण, ही सवय आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. कारण- अंडरवेअरद्वारे पसरणाऱ्या जीवाणूंमुळे घरात मोठे आजार पसरू शकतात. आता जाणून घ्या, अंडरवेअर्स इतर कपड्यांपासून वेगळं धुणं का आवश्यक आहे.

१. अंडरवेअरमध्ये लपतात ‘अतिसूक्ष्म’ घातक जीवाणू
एका संशोधनानुसार, दररोज वापरल्या जाणाऱ्या अंतर्वस्त्रांमध्ये सुमारे ०.१ ग्रॅम विष्ठेचे अंश असतात. जेव्हा तुम्ही ते इतर कपड्यांबरोबर वॉशिंग मशीनमध्ये टाकता, तेव्हा सुमारे १० कोटी ई.कोलाई  व स्टॅफिलोकोकस यांसारखे अतिसूक्ष्म घातक जीवाणू संपूर्ण पाण्यात मिसळतात. हेच पाणी नंतर इतर कपड्यांमधूनही संसर्गाचा प्रसार होतो.
२. थंड पाण्यानं धुणं म्हणजे संसर्ग वाढवणं

आपल्या आधुनिक वॉशिंग मशीनमध्ये बहुतेकदा आपण १५°C तापमानावरच कपडे धुतो. पण, अंडरवेअरमधील जीवाणू नष्ट करण्यासाठी किमान ४०°C तापमान आवश्यक असते. कोणाला काही त्वचेचा संसर्ग असेल, तर हे तापमान ६०°C पर्यंत वाढवणं आवश्यक आहे.

३. लहान मुलं व वृद्ध व्यक्तींना अधिक धोका
लहान मुलं व वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते. त्यामुळे अशा जंतूंपासून त्यांना गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे अंतर्वस्त्रे नेहमी उकळत्या पाण्यात किंवा स्वतंत्रपणे धुणे योग्य ठरेल.
४. स्वयंपाकघराच्या टॉवेल्ससह अंडरवेअर्स धुण्यामुळे विषबाधेचा धोका

जर तुम्ही अंडरवेअर आणि किचन टॉवेल्स एकत्र धुत असाल, तर तुमच्या या कृतीमुळे स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या भांड्यांवर ई.कोलाईसारखे जीवाणू पोहोचू शकतात. त्यामुळे जेवणात विष्ठेचे अंश मिसळल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

५. अयोग्य तापमानामुळे धोका अटळ
जर पाण्याचं तापमान योग्य नसेल, तर कितीही शक्तिशाली डिटर्जंट वापरूनही जंतुसंसर्ग टळणार नाही. तसेच ब्लीच असलेला डिटर्जंट किंवा विशेष लाँड्री डिसइन्फेक्टंट वापरणं आवश्यक आहे.
६. लिक्विड डिटर्जंट वापरणे चुकीचे

लिक्विड डिटर्जंटमध्ये ब्लीच नसते. त्यामुळे ते अंडरवेअरसारख्या संवेदनशील कपड्यांसाठी पुरेसे नसते. पावडर डिटर्जंटमध्ये ब्लीच असते आणि त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो.

निष्कर्ष :
एका चुकीच्या धुलाईमुळे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर गदा येऊ शकते. म्हणूनच अंडरवेअर्स इतर कपड्यांपासून वेगळ्या गरम पाण्यात आणि योग्य डिटर्जंट वापरून धुणं अत्यावश्यक आहे. ही सावधगिरी तुम्हाला आजारांपासून वाचवू शकते; नाही तर एक चूक तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाऊ शकते हे लक्षात घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.