पाकिस्तानातील या जोडप्याची अनोखी प्रेमकहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. एका श्रीमंत कुटुंबातील मुलीचा आपल्या घरातील ड्रायव्हरवर जीव दडला. दोघांमध्ये प्रेम झालं. एवढंच नव्हे, तर तिने स्वतःहून ड्रायव्हरला प्रपोज केलं आणि त्याच्याशी लग्न केलं. आता हा ड्रायव्हर त्या घराचा जावई बनला आहे. यूट्यूबर सैयद बासित अली यांच्या मुलाखतीत या 'अजब प्रेमाच्या गजब कहाणी'चा खुलासा झाला आहे, जी सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
कशी आहे ही प्रेमकहाणी?
ही कहाणी अशी आहे की, एका श्रीमंत घराण्यातील मुलीला आपल्या घरातील ड्रायव्हरशी प्रेम झालं. ड्रायव्हरची नम्रता, प्रामाणिकपणा आणि गाडीचा हॉर्न वाजवण्याची खास शैली यामुळे ती इतकी प्रभावित झाली की तिने त्याच्यामध्येच आपला जोडीदार शोधला. मग काय, ती ड्रायव्हरशी बोलण्याचे बहाणे शोधू लागली आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी त्याच्याकडेच मागणी करू लागली. अखेरीस, हिम्मत करून तिने त्याच्या समोर प्रेमाची कबुली दिली.
यूट्यूबर सैयद बासित यांच्या मुलाखतीत या मुलीने सांगितलं की, जेव्हा तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा ड्रायव्हर पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे कसं शक्य आहे. कारण त्यांच्यात कोणताही ताळमेळ नव्हता - तो गरीब होता आणि ती श्रीमंत घराण्यातील होती. पण म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं! मुलीने हार मानली नाही आणि आपल्या प्रेमाने ड्रायव्हरचं मन जिंकलं. अखेरीस ती त्याची वधू बनली.
प्रेमाचा पाया विश्वास आणि आदर
या जोडप्याने सांगितलं की, त्यांच्या नात्याचा पाया परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित आहे. त्यांनी असंही म्हटलं की, प्रेमात संपत्ती किंवा प्रसिद्धीला काही अर्थ नसतो. त्यांच्यासाठी खरं प्रेम हेच सर्वकाही आहे. मुलीने तर असंही सांगितलं की, जर हा ड्रायव्हर तिच्या आयुष्यात नसता, तर तिचं आयुष्य कदाचित अपूर्ण राहिलं असतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.