सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम विकास प्रस्तावास मंजुरी द्या आमदार गाडगीळ; मुख्यमंत्र्यांकडे ६० कोटींच्या निधीची मागणी
सांगली,दि.१७: सांगलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यासाठी शहराच्या मध्यभागी स्टेडियमसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन त्यासाठी ६० कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधिमंडळ अधिवेशन दरम्यान केली आहे.
आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले की,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पामध्ये सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल आणि हॉकी मैदान, कबड्डी मैदान, बास्केटबॉल मैदान, टेनिस कोर्ट ,क्लब हाऊस, पार्किंग आणि गॅलरी यासह इतर सुविधांचा समावेश आहे. त्यासाठी ६९ कोटी रुपयांचा अंदाजीत खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे त्याला तातडीने मंजुरी द्यावी.
सांगली आणि सांगली जिल्हा ही क्रीडानगरी आहे. क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन या खेळामध्ये जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी जागतिक कीर्तीचा नालौकिक मिळवलेला आहे. सांगली शहर आणि जिल्हा कबड्डी आणि ॲथलेटिक्स चे माहेरघर मानले जाते. या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम विकसित झाल्यास येथील नवोदित आणि उदयन्मुख खेळाडूंना फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे. यासाठी या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.