Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरच्या वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, त्या विधानाची होतेय चर्चा; थेट....

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरच्या वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, त्या विधानाची होतेय चर्चा; थेट....
 

बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. तिने नुकताच रडातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. अनेक वर्षांपासून घरात छळ होत असल्याते सांगत मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचे तनुश्रीने त्यात नमूद केले होते. त्यानंतर आज टीव्ही9 मराठीशी बोलताना तिने यावर सविस्तर प्रतिक्रिया देत अनेक गोष्टींचा खुलासा केला तसेच अभिनेता नाना पाटेकर यांचं नाव घेत त्यांच्यावरही पुन्हा अनेक आरोप केलेत.

आपल्याला होत असलेला त्रास आणि मानसिक छळ यांना नाना पाटेकर जबाबदार असल्याचा दावा तिने टीव्ही9 मराठीशी बोलताना केला. मी साईन केलेले प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घेण्यात आले. मला हा त्रास देण्यात नाना पाटेकरांचा हात असल्याचा गंभीर आरोप तनुश्रीने थेट केल्याने आता मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या या वादात आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी मारली आहे. एवढंच नव्हे तर या विषयावर बोलताना सदावर्ते यांनी केलेल्या या विधानाचीदेखील सध्या बरीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते ?
तनुश्री दत्ताच्या या विषयात अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांनी लक्ष घालावे अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. पुन्हा एकदा सुशांत सिंह होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर अभिनेता नाना पाटेकर मोठा आहे असं नाही असं म्हणतानाच चित्रपटातील गुंडागर्दी आणि खऱ्या आयुष्यात फरक आहे. महिला आयोग, मानवाधिकार आयोगाने तनुश्री दत्ताच्या वक्तव्यांची, तसेच तिची तक्रार गांभीर्याने घ्यावी अशी मागणीही सदावर्ते यांनी केली.
कोणीही मर्यादेत रहायचं

कलाकारांत कुणीही ज्येष्ठ होत नाही, दादागिरीवर सिनीयर होऊ शकत नाही असंही सदावर्ते यांनी सुनावलं. नाना पाटेकर आणि कुणीही असो मर्यादेत रहायचं असं म्हणत नाना पाटेकरांना माझे सूचक बोल समजले असतील असा इशाराहीं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

भाषिक वादावरही केली टिप्पणी
महाराष्ट्रातील हिंदी आणि मराठी वादामध्ये राज्यपालांनी उडी घेतली. राज्यपाल यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का ? असं वक्तव्य सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरे व बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. तर राज्यपालांनीही मराठीतच बोललं पाहिजे, असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले होते.

आता याच वक्तव्यावरून सदावर्ते यांनी आदित्य ठाकरेंनाही सुनावलं. आदित्य ठाकरे आणि टीका करणारे भाषिक वाद निर्माण करत आहेत. संविधानाचा एखादा आठवडा क्लास लावून घ्या असा टोला सदावर्ते यांनी लगावला. तुम्ही विधानसभेत आहात, राज्यपालसाहेब सूचक बोलले. कुठल्याही नागरिकासोबत भेदभाव होता करता येत नाही. मारल्यानंतर लगेच मराठी येणार का असा सावला विचारत सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे, असं सदावर्ते म्हणाले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.