मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबईउच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षाची तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या पाच जणांनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने त्यांचा अपील मान्य केला. फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पण न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे.
१२ दोषींपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. तर ११ जणांचा आता तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली आहे. गेली १९ वर्ष यातील दोषी एकही दिवस तुरुंगाबाहेर आले नव्हते. मुंबईत ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकलमध्ये एकूण ७ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मीरारोड या रेल्वे स्थानकांदरम्यान स्फोट झाले होते. यात २०९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.