Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

व्हाईट हाऊसमध्ये FBI एजंट आले अन् बराक ओबामा यांना कॉलर धरून घेऊन गेले; ट्रम्प हसत राहिले...

व्हाईट हाऊसमध्ये FBI एजंट आले अन् बराक ओबामा यांना कॉलर धरून घेऊन गेले; ट्रम्प हसत राहिले... पाहा व्हिडीओ
 

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अगदी बेभरवशी असे नेते आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे आपसूकच जगभरात त्यांना महत्व मिळते. पण ट्रम्प महाशय कधी काय करतील, हे कुणीही सांगू शकत नाही. ट्रम्प यांच्या या वागण्याची प्रचिती देणारा एक प्रकार समोर आला आहे. यात चक्क ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाच एफबीआयच्या मदतीने अटक केल्याचे दिसून येत आहे.

ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडिओ

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना FBI एजंट व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अटक करताना दाखवले आहे. या व्हिडीओची सुरुवात ओबामा यांच्या एका जुन्या विधानाने होते - "कोणीही, अगदी राष्ट्राध्यक्षसुद्धा, कायद्याच्या वर नाही." त्यानंतर अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांच्या क्लिप्स दिसतात. त्यामध्ये ज्यो बायडेनदेखील याच विधानाची पुनरावृत्ती करताना दिसतात.




ओबामा तुरूंगात...

यानंतर व्हिडीओमध्ये दिसते की, बराक ओबामा हे ट्रम्प यांच्या शेजारी बसले आहेत. इतक्यात FBI चे तीन एजंट येतात, आणि चक्क ओबामांच्या शर्टाची कॉलर पकडतात, त्यांना ढकलून खाली पाडतात आणि हातकड्या घालतात. हे सगळं होताना ट्रम्प बराक ओबामा यांच्या बाजूलाच बसून हसताना दिसतात. शेवटी, ओबामा हे तुरुंगातील युनिफॉर्ममध्ये एका तुरुंगाच्या कोठडीत दिसून येतात. पण, थांबा. ट्रम्प यांचे वागणे विक्षिप्त वाटणारे असले तरी अद्याप त्यांनी अशाप्रकारचे काहीही केलेले नाही. कारण हा व्हिडिओ खरा नाही. तर पूर्णपणे AI जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेला) आहे.

एपस्टीन प्रकरणावरून लक्ष हटविण्याचा प्रकार

दरम्यान, या व्हिडीओवरून ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ "उकसवणारा" आणि "लोकशाहीसाठी धोकादायक" असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्टपणे कुठेही सांगितलेले नाही. त्यांनी हे काल्पनिक दृश्य आहे की नाही, याबद्दल काही स्पष्टीकरण दिलेले नाही. काही तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की हा व्हिडीओ शेअर करून ट्रम्प जनतेचे लक्ष एपस्टीन प्रकरणापासून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

2016 च्या निवडणुकीबाबतचे गंभीर आरोप

ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वीच असा आरोप केला होता की, ओबामा प्रशासनाने 2016 मध्ये ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूकीत फसवणुकीचे कटकारस्थान रचले होते. यावरूनच अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी एक मोठा दावा केला की, ओबामा व त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून ट्रम्प यांच्याविरोधात देशद्रोही कट रचला. या कटाचा उद्देश असा होता की ट्रम्प यांचा निवडणुकीतील विजय रशियाच्या मदतीने झाल्याचे सिद्ध करणे.

काय म्हणाल्या तुलसी गबार्ड

गबार्ड म्हणाल्या की, 'रशिया होक्स' ही एक बनावट षडयंत्र होते. गबार्ड यांच्या म्हणण्यानुसार, खोट्या गुप्तचर अहवाल तयार केले गेले. क्रिस्टोफर स्टील नावाच्या ब्रिटिश गुप्तचर अधिकाऱ्याने तयार केलेला एक रिपोर्ट, जो अविश्वसनीय मानला गेला होता तरीही त्याचा वापर पुराव्याच्या रूपात करण्यात आला. ओबामा यांच्यासोबतच जेम्स क्लॅपर (राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख), जॉन ब्रेनन (CIA प्रमुख), जॉन केरी (परराष्ट्र मंत्री), सुजान राईस (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार), एंड्र्यू मॅक्केब (FBI डेप्युटी डायरेक्टर) हे या कारस्थानात होते.

प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरवली गेली..

माध्यमांमध्ये बनावट माहिती लीक केली गेली. 9 डिसेंबर 2016 रोजी ओबामा प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमची एक बैठक झाली. यानंतर काही गुप्तचर अधिकार्‍यांनी Washington Post आणि इतर माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक बनावट माहिती लीक केली. यामध्ये असा दावा केला गेला की रशियाने ट्रम्प यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी सायबर हल्ले केले.

लोकशाही वाचवायची असेल तर कारवाई हवीच...

गबार्ड म्हणतात की, जर या कारस्थानातील दोषींवर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर लोकांचा लोकशाहीमधील विश्वास संपेल. ही बाब अमेरिकेच्या भविष्यासाठी फारच घातक ठरू शकते. ट्रम्प यांनी AI च्या माध्यमातून बराक ओबामा यांच्या अटकेचा बनावट व्हिडीओ शेअर करून वाद निर्माण केला आहे. हे फक्त राजकीय प्रहार आहे की जनमत तयार करण्याचा प्रयत्न, यावर चर्चा सुरु आहे. पण या प्रकारामुळे अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.