वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी आपण सेवेतून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. आपण स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या राजीनाम्यासह सिद्धार्थ कौशल यांची आंध्र प्रदेशातील कायदा अंमलबजावणीतील कारकिर्द संपली आहे. सिद्धार्थ कौशल यांनी अधिकृत प्रेस रिलीज जारी केली असून, आपल्या निवृत्तीचा पूर्णपणे स्वतंत्र, वैयक्तिक आणि ऐच्छिक असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच छळ किंवा बाहेरुन येणाऱ्या दबावामुळे राजीनामा दिल्याचे दावे फेटाळले आहेत. हे सर्व दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"मी भारतीय पोलीस सेवेतून स्वेच्छेने राजीनामा देत आहे. माझा हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असून, तो घेण्याआधी मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या दीर्घकालीन जीवनातील ध्येयं आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार हे पाऊल उचललं आहे," असं त्यांनी सांगितलं आहे. "नुकतंच माझ्या राजीनाम्यासंबंधी काही खोटे दावे करण्यात आले होते. ज्यामध्ये छळ आणि बाहेरुन येणारा दबाव यांचा उल्लेख होता. मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की, असे दावे निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत. माझा निर्णय स्वतंत्र, खासगी आणि ऐच्छिक आहे," असंही सिद्धार्थ कौशल यांनी सांगितलं आहे.
आयपीएसमध्ये सेवा करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात समाधानकारक आणि समृद्ध करणारा प्रवास होता अशी भावना त्यांनी व्यक्त केला आहे. "हे राज्य नेहमीच माझं घर राहिलं आहे आणि येथील लोक माझ्या हृदयात खोल प्रेम आणि अभिमानाने राहतील," असंही ते पुढे म्हणाले आहेत. दरम्यान सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आयपीएस अधिकाऱ्यांवरील दबावाचा एक पॅटर्न म्हणून या राजीनाम्याकडे पाहिलं जाऊ शकतं.शेवटी त्यांनी लिहिलं आहे की, "पुढील वाटचाल करताना आता मी कृतज्ञता, उद्देश आणि स्पष्टतेने येणाऱ्या काळात नवीन आणि अर्थपूर्ण मार्गांनी समाजात योगदान देण्याचा प्रयत्न करतो". सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ कौशल खासगी क्षेत्रात प्रवेश करण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत कॉर्पोरेट भूमिकेत ते दिसण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे आयपीएस अधिकाऱ्यांमधील वाढती अस्वस्थता दिसून येते, कारण अनेक अधिकाऱ्यांना दीर्घकाळ पोस्टिंग विलंब, निलंबन किंवा बदल्यांचा सामना करावा लागला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.