सणासुदीच्या काळात सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी सुधाराच्या नव्या प्रस्तावाला मंत्र्यांच्या गटाने (GoM) मंजुरी दिली असून अंतिम निर्णय सप्टेंबर 3-4 रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
या प्रस्तावानुसार 90 टक्के वस्तूंवर जीएसटी दर कमी होऊ शकतो. विशेषत: कार आणि दुचाकीच्या किमतीत मोठी घट अपेक्षित आहे. नोमुरा या ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या अहवालानुसार, छोट्या कार व दुचाकींवर जीएसटी 28% वरून 18% इतका कमी होऊ शकतो, तर मोठ्या वाहनांवरचा दर 43-50% वरून 40% होऊ शकतो.
या बदलामुळे कारच्या किमतीत 1.4 लाख रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते आणि मासिक ईएमआय तब्बल 2,000 रुपयांनी कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, मारुती वॅगन-आरची सध्याची ऑन-रोड किंमत 7.48 लाख असून ती कमी होऊन 6.84 लाखांपर्यंत येऊ शकते. त्याचप्रमाणे ब्रेझा आणि हुंडई क्रेटा यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किंमतींमध्येही काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.
दुचाकींनाही दिलासा
दुचाकी वाहनांच्या किमतीतही फरक पडेल. होंडा अॅक्टिवा तब्बल ₹7,452 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, ज्यामुळे ईएमआय सुमारे ₹ 122 ने कमी होईल. रॉयल एनफील्ड क्लासिकवर सुरुवातीला जवळपास ₹18,000 पर्यंत बचत होऊ शकते.
ऑटो सेक्टरला चालना
नोमुराच्या अंदाजानुसार, या सुधारामुळे केवळ गाड्यांच्या किंमती कमी होणार नाहीत तर ऑटो सेक्टरलाही मोठा फायदा होईल. या वर्षात वाहनांच्या मागणीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: एसयूव्ही आणि मोठ्या गाड्यांच्या ग्राहकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये ग्राहकांची मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे, कारण आता खरेदीदार फीचर-पॅक आणि स्टायलिश वाहनांकडे जास्त आकर्षित होत आहेत.Q1: जीएसटी कौन्सिलचा निर्णय कधी होणार?- 3-4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.Q2: गाड्यांच्या किमती किती कमी होऊ शकतात?- छोट्या कार 1.4 लाखांपर्यंत स्वस्त होऊ शकतात, EMIमध्ये 2,000 रुपयांपर्यंत बचत होईल.Q3: दुचाकींवर किती फरक पडेल?- होंडा अॅक्टिवा ₹7,452 स्वस्त होईल, तर रॉयल एनफील्डवर तब्बल ₹18,000 पर्यंत बचत शक्य.Q4: ऑटो सेक्टरवर याचा काय परिणाम होईल?- मागणीत 5-10% वाढ अपेक्षित असून SUV सेगमेंटला सर्वाधिक फायदा होईल.Q5: हा बदल सर्व वस्तूंवर लागू होणार आहे का?- हो, प्रस्तावानुसार 90% वस्तूंवरील जीएसटी दरात घट होणार असून आवश्यक वस्तूंवर 5% कर लावला जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.