Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुशखबर! तलाठी भरतीची नवीन 1700 पदांची जाहिरात येणार! महत्वाची अपडेट..!!

खुशखबर! तलाठी भरतीची नवीन 1700 पदांची जाहिरात येणार! महत्वाची अपडेट..!!
 

राज्यात तलाठ्यांच्या २४७१ जागा रिक्त आहेत. तसेच बावनकुळे यान दिलेल्या माहिती नुसार, तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे हि तलाठी भरती प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरु होणार असल्याचे दिसत आहे. तसेही, सध्या एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार आहे. तसेच तलाठ्यांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सन २०१८-२०१९ मध्ये तलाठी भरती झाली. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षे, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे भरती रखडली होती. २०२३-२०२४ मध्ये भरती पुन्हा सुरू झाली. सरळसेवेने २०८ तसेच अनुकंपाच्या माध्यमातून अंदाजे २८ पदे भरली. त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आली नाही. मात्र, नवीन आकृतीबंधानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांची एकूण ६५४ पदे मंजूर आहेत. त्यातील ६१९ तलाठ्थांची भरती झाली आहे. उर्वरित ३५ पदे रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात तलाठ्यांच्या कमी जागा रिक्त आहेत.

राज्यात शासनाच्या एकूण विभागांपैकी महसूल विभाग महत्त्वाचा विभाग समजला जातो. कारण या विभागाकडूनच राज्याला महसूल मिळतो. कोरोनामुळे मध्यन्तरी तलाठी भरती प्रक्रिया रखडली, त्यानंतर लोकसभा-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका व न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती थांबली होती. राज्यात २४७१ तलाठ्यांची पदे रिक्त आहेत, तर जिल्ह्यात महसूल सहापकांव्या १४१ जागा रिक्त आहेत. जागा भरल्या तर कामाला गती येणार आहे. लोकांची कामेही लवकर होतील. तलाठीच्या रिक्त जागांमुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक शासकीय योजनांसह शेतकऱ्यांचीही कामे थांबलेली आहेत. पुनर्वसन, महसूल आणि भूसंपादन यासह राज्यातील महसूल विभागात ३ हजार पदे रिक्त आहेत. यात २ हजार ४७१ तलाठ्यांचीच पदे रिक्त असल्याने आजच्या घडीला एकेका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. विविध जिल्ह्यात नवीन भरती तलाठी भरतीतून तलाठी मिळतील. राज्याला सर्वाधिक महसूल हा याच विभागाकडून मिळतो. यात तलाठ्यांचा हा मुख्य कणा आहे. त्यामुळे शासन तलाठी भरती प्रक्रिया लवकरच राबवेल अपेक्षा आहे.

राज्यात महसूल विभागात सुमारे ३ हजार पदे रिक्त आहेत. त्यातही सर्वाधिक २४७१ रिक्त पदे तलाठ्यांची असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो. अनेकदा एखाद्या गावात तलाठी १५ दिवसातून एकदाच येतात. यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार- वेळा तरी चढाव्याच लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावरदेखील पडतो. राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी 'क' वर्गाचा क्रमांक पहिला आहे. प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. कारण एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. सातबारा, शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांचीच असतात. तलाठ्याची गावपातळीवरील ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्याच खांद्यावर येऊन पडला आहे. त्यामुळे येत्या २०२५ तलाठी भरती होणे आवश्यक आहे. तेव्हाच राज्याची सुव्यवस्था आटोक्यात येईल. सरकार सुद्धा या दिशेनं पॉल उचलेल आणि हि भरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे समजते.

राज्यात सध्या रेतीमाफियांबरोबर दोन हात करण्याचे काम हेच तलाठी करतात. राज्यात सर्वाधिक हल्ले हे रेतीमाफियांकडून तलाठ्यांवर झाले आहेत. सध्या चोरीची रेती रोखण्याचीही मोठी जबाबदारी महसूल खात्याने तलाठ्यांवरच सोपवली आहे. चार- चार गावांचा कारभार सांभाळतानाच या गावांच्या सीमेवर रात्रीची पाळत ठेवण्याचीही जबाबदारी तलाठ्यांना पार पाडावी लागत आहे. परिणामी शेती, बखळ जागेच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागत असून पंचनाम्यासाठी एका तलाठ्याला तीन ते चार गावे करताना दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागतो. सहा महिन्यांपूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आली, मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाठ्यांवरील भार कमी होणार नाही.
प्रवर्गनिहाय संख्या
 
सर्वसाधारण १६७६
महिला १४७३
खेळाडू २१६
माजी सैनिक ७०५
प्रकल्पग्रस्त २१३
भूकंपग्रस्त ६३
पवीधर अंशकालीन ४४७
जिल्हानिहाय पदांची संख्या

सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
पेसा क्षेत्रांची यादी
दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय

पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा TCS या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
 
पदाचे नाव -तलाठी
 
पद संख्या - ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता -पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
परीक्षा शुल्क - खुला वर्ग रु. १०००/- - राखीव वर्ग : ९००/-
अर्ज पद्धती - ऑनलाईन (लिंक लवकरच सुरु होईल)
अधिकृत वेबसाईट - https://mahabhumi.gov.in
महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
 
पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.