Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सिगारेटनं काळा धंदा उघडकीस, छत्रपती संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, 88 लाखांचा मुद्देमाल जप्त

Breaking News! सिगारेटनं काळा धंदा उघडकीस, छत्रपती संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, 88 लाखांचा मुद्देमाल जप्त
 


छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीमधील साजापूर क्रांतीनगर भागात कार्यरत असलेला बनावट नोटा छापणारा छुपा छापखाना अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५९ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण ८८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सिगारेट अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू करण्याचं कारण ठरलं सिगारेट. 27 जुलैला आंबीलवाडी भागात दोन जण पोलिसांनी ताब्यात घेतली. ते दोघं 500 रुपयांच्या बनावट रुपयांचा वापर करत सिगारेट खरेदी करत होते. पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्याकडून 80 हजारांच्या बनावट नोटा आणि मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी त्यानंतर छापखान्यावर धाड ठाकली. हा छापखाना वाळूंज येथे कार्यरत होता. तेथे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरली जाणार शाई, कागद इत्यादी साहित्य जप्त केले गेले. यापासून 2 कोटी 16 लाखांच्या नोटा तयार झाल्या असत्या.
आरोपी गजाआड
 
या प्रकरणी प्रदीप कापरे, सोमनाथ शिंदे, विनोद अर्बट, आकाश बनसोडे, शिवाजी गंगर्डे, अनिल पवार यांना अटक केली असून मुख्य सुत्रधार अंबादास ससाणे फरार आहे. फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटा तयार करण्याचे काम करत होते. तर प्रदीप कापरे हा बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन जात असे. या टोळीने 50 हजार रुपये देत 1 लाखांच्या नोटा दिल्या होत्या.
 
आरोपींचा मोठा प्लॅन उद्धवस्त
या टोळीला बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा वितरित करायच्या होत्या आणि त्यातून माल कमावयाचा त्यांचा इरादा होता. पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आणि सतर्कतेमुळे हे रॅकेट उद्धवस्त झाले. आणि आरोपींना गजाआड करण्यात आले. अहिल्यानगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गितेंनी कारवाईचे नेतृत्व केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.