Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलाला संपवलं'' माजी पोलिस अधिकाऱ्याचा दावा

''वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलाला संपवलं'' माजी पोलिस अधिकाऱ्याचा दावा
 




संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा किती निर्दयी खुनी होता, हे आता पुढे येत आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने आणखी एक दावा केला असून वाल्मिकने आतापर्यंत २५ तरी खून केले असतील आणि त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असं ते म्हणाले आहेत.

सेवेतून बडतर्फ केलेले पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी हा नवा दावा केला आहे. ते म्हणाले की, वाल्मिक कराडने कमीत कमी २५ तरी मर्डर केले असतील. एका १४ वर्षांच्या मुलाचाही खून त्याने केला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.

कासले पुढे म्हणाले, वाल्मिकने काही लोकांना बॉयलरमध्ये टाकून संपवलं, काहींचे तुकडे करुन नदीमध्ये फेकून दिलं.. तो अतिशय विकृत माणूस आहे. आजही त्याचा मुलगा श्री कराड मला फोन करुन त्रास देतोय. १४ वर्षांच्या मुलाला मारल्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे, असं कासले म्हणाले.

दरम्यान, वाल्मिक कराडने केलेले खून आणि एकूणच परळीमध्ये झालेले खून; या सगळ्या प्रकरणांसाठी एकत्रित एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांची आहे. ते मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देणार आहेत. परळीतली दहशत आता संपत आलेली असली तरी यापूर्वी जे खून झालेले आहेत, त्यांचा ससेमीरा धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळच्या लोकांमागे लागणार आहे.


दुसरीकडे महादेव मुंडे खून प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने तसे आदेश दिले होते.

एसआयटीमध्ये कोण?

पूर्वी बीडमध्ये डीवायएसपी म्हणून असलेले आणि सध्या अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक असलेले पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे. कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.