Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्टरांनी दिलाय सल्ला

डायबिटीजला पळवून टाकेल ही 20 रुपयांची भाजी; आठवड्यातील फक्त 4 दिवस सेवन करा; स्वतः डॉक्टरांनी दिलाय सल्ला
 

घडती जीवनशैली आणि वातावरणातील बदल यामुळे अनेकजण आजकाल कमी वयातच अनेक आजारांनी ग्रासलेले आहेत. काही आजार असे असतात ज्यांवर उपचार केले जाऊ शकतात पण काही असे असतात ज्यांवर कोणतेही उपचार केले जाऊ शकत नाहीत आणि यापैकीच एक गंभीर आणि वाढत चाललेला आजार म्हणजे मधुमेह. मधुमेह ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरातील रक्तातील साखरेची (ग्लुकोजची) पातळी वाढते, कारण स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही.
 
मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते घ्यावी लागते कारण साखरेची पातळी जरा जरी वाढली तर त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा यामुळे जीवाचा धोकाही निर्माण होतो. अशातच आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी एका खास भाजीची माहिती देत आहोत जिच्या सेवनाने तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्हाला यासाठी फार काही करण्याची गरज नाही फक्त नियमितपणे या भाजीचे सेवन करायचे आहे. ही भाजी आकाराने छोटी, हिरवी आणि साधी वाटते पण आयुर्वेदात आणि आधुनिक शास्त्रात या भाजीत अनेक पोषक घटक दडलेले आढळून आले आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. या भाजीचे नाव आहे तोंडली. बाजारात ही भाजी सहज फार कमी ददरात उपलब्ध होते ज्यामुळे आपल्या रोजच्या आहारात सहजपणे तुम्ही हिचा समावेश करू शकता.

रक्तातील साखर नियंत्रणात होईल

तोंडलीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात जे रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी विशेष करून ही भाजी फार फायद्याची ठरते. आयुर्वेदातही या भाजीला फार महत्त्व देण्यात आलं आहे.

पचनसंस्था मजबूत करते

अनेकदा चुकीच्या आहारामुळे शरीरात अपचन, पोटफुगी आणि आम्लपित्ताची समस्या जाणवू लागते. अशात तोंडलीतील तंतुमय घटक या आरोग्य समस्या दूर करण्यास मदत करतात. नियमित या भाजीचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. एवढेच काय तर यामुळे आपल्या त्वचेवरही नैसर्गिक तेज पाहायला मिळतो.

वजन कमी करण्यास मदत करते
आजकाल लठ्ठपणा हा अनेकांना जडणारा सामान्य आजार बनला आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही तोंडलीच्या भाजीचे सेवन करू शकता. यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि याचे सेवन अधिक काळ पोट भरलेले ठेवते ज्यामुळे वजन कमी करण्यास त्याची खास मदत होते. पण लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी फक्त भाजीचे सेवन पुरेसे नाही तर त्यासोबतच व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
हाडांना आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळ

तोंडलीमध्ये कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक घटकांचा साठा आहे, जे दात आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. कमकुवत होत चाललेली हाडे या भाजीच्या सेवनाने पुन्हा मजबूत करता येतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे शरीराचे कोणत्याही संसर्गांपासून संरक्षण होते. पावसाळ्यात याचे सेवन अनेक आजरापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

शरीर शुद्ध करणारी गुणकारी भाजी
आपल्या शरीरात अनेक विषारी द्रवपदार्थ साठत असतात ज्यांना शरीराबाहेर काढण्यात तोंडलीची भाजी आपली मदत करते. बॉडी डिटॉक्ससाठी याचे सेवन फायद्याचे आहे. यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते आणि शरीर स्वछ होते. हे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासही मदत करते.
तोंडलीचे सेवन कसे करावे?
 
तुम्ही तोंडलीची भाजी करून किंवा याला मसाल्यात कोट करून छान कुरकुरीत तळून याचे सेवन करू शकता. तुम्ही मसाले भातातही तोंडली टाकू शकता.

तोंडली किती दिवस फ्रेश राहते?
 
तोंडलीच्या भाजीला फ्रिजमध्ये ६-८ दिवसांपर्यंत फ्रेश ठेवता येते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.