न्यूयॉर्कमधील बफेलो शहरातून वेस्ट व्हर्जिनियाला धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या चार वृद्धांचा एका भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या चौघांचा शोध 2 ऑगस्ट 2025 रोजी अखेर संपला, पण तो एका हृदयद्रावक बातमीसह. या घटनेने अमेरिकेतील भारतीय समुदायाला मोठा धक्का बसला आहे.
कोण होते हे चार वृद्ध?
हे चौघेही एकाच कुटुंबातील सदस्य होते. त्यांची नावे डॉ. किशोर दिवान (८९ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशा दिवान (८५ वर्षे), शैलेश दिवान (८६ वर्षे) आणि त्यांची पत्नी गीता दिवान (८४ वर्षे) यांचा समावेश आहे. हे सर्व न्यूयॉर्कमधील बफेलो शहरात राहत
होते आणि वेस्ट व्हर्जिनियातील प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड (इस्कॉनचे धार्मिक
स्थळ) येथे दर्शनासाठी गेले होते. प्रवासासाठी ते त्यांच्या हलक्या
हिरव्या रंगाच्या टोयोटा कॅमरी (न्यू यॉर्क क्रमांक: EKW2611) गाडीचा वापर
करत होते.
अपघाताचे कारण आणि शोधमोहीम!
हे चार वृद्ध 29 जुलै रोजी आपल्या प्रवासाला निघाले होते आणि त्यांनी त्याच दिवशी रात्री प्रभुपाद पॅलेस ऑफ गोल्ड येथे मुक्काम करण्याची योजना आखली होती. मात्र, पोलिसांच्या मते, ते त्यांच्या नियोजित ठिकाणी कधीही पोहोचले नाहीत.
शेवटचा ठावठिकाणा
29 जुलै रोजी दुपारी 2:45 वाजता, त्यांना पेनसिल्व्हेनियातील एरी येथील एका बर्गर किंग रेस्टॉरंटमध्ये पाहिले गेले होते. त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर तिथे झाला होता आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यापैकी दोन व्यक्ती दिसत होत्या.
फोन डेटावरुन उघड!
त्यांचे मोबाईल फोन शेवटचे 30 जुलै रोजी पहाटे ३ वाजता माउंड्सविले आणि व्हीलिंग येथे सक्रिय होते, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला.
कुटुंबाने बेपत्ता झाल्याची दिली होती तक्रार!
कुटुंबाने बेपत्ता झाल्याची दिली होती तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मार्शल काउंटी शेरीफच्या कार्यालयाने हेलिकॉप्टर, ड्रोन आणि अतिरिक्त पोलीस पथकांचा वापर केला. शेरीफ माइक डगर्टी यांनी गाडीचे फोटो आणि वर्णन जाहीर करून जनतेला मदतीसाठी आवाहन केले. अखेर २ ऑगस्ट रोजी त्यांची गाडी वेस्ट व्हर्जिनियातील मार्शल काउंटीमधील बिग व्हीलिंग क्रीक रोडजवळ एका खोल खड्ड्यात उलटलेली अवस्थेत सापडली. या अपघातात गाडीतील सर्व चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेने कुटुंबावर आणि भारतीय समुदायावर शोककळा पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.