Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणातील जैन समाजाचे 7 पावरफुल आमदार! पावर आणि पैसा दोन्ही; एक आमदार पवारांच्या 27 पट श्रीमंत; नाव जाणून शॉक व्हाल

महाराष्ट्राच्या राजकारणातील जैन समाजाचे 7 पावरफुल आमदार! पावर आणि पैसा दोन्ही; एक आमदार पवारांच्या 27 पट श्रीमंत; नाव जाणून शॉक व्हाल
 

कबुतरखान्यांवरील बंदीवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद केलेत. दादरमधील प्रसिद्ध कबुतरखानाही बंद कऱण्यात आलाय. कबुतरांना दाणे न टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. या वादात महाराष्ट्रातील जैन समजाचे आमदार आपल्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील जैन धर्माचे 7 पावरफुल आमदार कोणते जाणून घेऊया.

मुंबई महापालिकेने कबुतरखाना बंद करण्यासाठी तीव्र मोहीम सुरू केली आहे. याविरोधात पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याची दखल घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलंय. या पत्रातून पक्षप्रेमी, स्थानिकांच्या भावना लक्षात घेण्याची विनंती करण्यात आलीय. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलंय. मंगलप्रभात लोढा हे महारष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. मंगलप्रभात लोढा हे जैन समजाचे आहेत.

2024 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जैन समाजाचे 7 आमदार निवडून आले. तीन आमदार मुंबई महानगर प्रदेशातील आहेत, ज्यात मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांचा समावेश आहे. या 7 आमदारांपैकी 6 आमदार भाजपमधून निवडून आले होते तर एक अपक्ष म्हणून निवडून आला होता. औरंगाबादच्या गंगापूरमधून प्रशांत बंब, बुलढाणा मानकापूरमधून चैनसुख संचेती आणि कोल्हापूर इचलकरंजीतून राहुल आवडे हेही भाजपचेच आहेत. या यादीत शिरोळचे अपक्ष उमेदवार राजेंद्र यड्रावकर हे एकमेव अपक्ष आमदार आहेत.

पराग शहा  असे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदाराचे नाव आहे. पराग शहा हे मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी सध्याची संपत्ती 3353.06 इतकी असल्याचे नमूद केले आहे. पाच वर्षात पराग शहा यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्र सादर करताना त्यांची संपत्ती 550 कोटी असल्याचे नमूद केले होते. अजित पवार यांच्याकडे 124 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्यावर 21.39 कोटी रुपये कर्ज आहे.

मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिलचे आमदार आहेत. मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 441 कोटी इतकी आहे. प्रशांत बंब 7,96,31,805 रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. नरेंद्र मेहतांकडे 63 कोटींची संपत्ती आहे. प्रशांत बंब यांच्याकडे 7 कोटींची संपत्ती आहे. चैनसुख संचेती 16 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. राहुल आवडे 12 कोटी तर राजेंद्र यड्रावकर हे 11 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना आमदारांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.