देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारल्यापासून प्रशासनात मोठे बदल केले आहेत. त्यांनी IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धडाकाच लावला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या होत असलेल्या बदल्यांनी खळबळ उडवली आहे. आता 15 ऑगस्टच्या तोंडावर पुन्हा एकदा आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्य सरकारने मंगळवारी (ता.12) सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश निघाले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये डॉ. अशोक करंजकर, संजय कोलते यांच्यासह सुशील खोडवेकर यांचाही समावेश आहे.
गेल्याच आठवड्यात तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी चार आयएसएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात मुंढे यांची बदली मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी, नितीन काशीनाथ पाटील यांची महाराष्ट्राच्या राज्य कराचे विशेष आयुक्त तर अभय महाजन यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली होती.
1. डॉ. अशोक करंजकर (IAS:SCS:2009) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.2. संजय कोलते (IAS:SCS:2010) जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.3. सुशील खोडवेकर (IAS:RR:2011) सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.4. सावन कुमार (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.5. नमन गोयल (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.6. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त (IAS:RR:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.7. लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा चांगलाच धडाकाच लावल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारकडून महिन्याभरात दोन तीनदा बदल्यांचा आदेश काढला जात आहे. यामुळे प्रशासकीय विभागात बदल्यांमुळे खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.