Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोटातली नस, छातीचं हाड तोडलं, सुंदर बायकोनं नवऱ्यालाच संपवलं; मुंबईतला हादरवून टाकणारा कांड!

पोटातली नस, छातीचं हाड तोडलं, सुंदर बायकोनं नवऱ्यालाच संपवलं; मुंबईतला हादरवून टाकणारा कांड!
 

मुंबईत विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेने आपल्याच पतीला अत्यंत भयाकन पद्धतीने संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला अमानुष मारहाण केली. तसेच रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरातच त्याला डांबून ठेवले. यातच प्रकृती खालावल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 
नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत राहणाऱ्या राजश्री अहिरे (35) हिचा तिचा पती भरत लक्ष्मण अहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. राजश्री अहिरे यांचे चंद्रशेखर नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. याच कारणामुळे विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने राजश्री आणि चंद्रशेखर यांनी भरतला संपवण्याचा कट रचला. ठरल्यानुसार 15 जुलैच्या रात्री चंद्रशेखरने भरतला गोरेगाव पूर्वेतील एका ठिकाणी बोलावले. दोघांनीही चंद्रशेखरच्या भावाच्या मदतीने भरतला मारहाण केली. त्यानंतर भरत यांना रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपी पत्नी त्यांना घरी घेऊन गेली. आरोपी महिलेने आपल्या पतीला तीन दिवस उपचाराशिवाय ठेवले. यातच भरत यांची प्रकृती खालावत गेली. पती मराला ठेपला आहे, हे माहिती असूनही पत्नीने त्याला रुग्णालयात दाखल केले नाही. परिणामी यातच अखेर भरत यांचा मृत्यू झाला.

मुलीला मारून टाकण्याची धमकी
विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर निर्दयी पत्नी राजश्री अर्धमेल्या भरत यांना सतत धमकी देत होती. तुला मारहाण झाल्याचे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांनाही मारून टाकीन असं राजश्री भरत यांना सांगायची. पत्नीकडून मिळणारी धमकी आणि झालेली मारहाण यामुळे भरत यांची प्रकृती जास्तच खालावली. पुढे 16 जुलै रोजी भरत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पाच शस्त्रक्रिया केल्या पण…

भरत यांना वाचवण्यासाठी पाच ऑपरेशन्स करण्यात आले. मात्र ते वाचू शकले नाहीत. त्यांचा 5 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरे पोलिसांनी खून आणि खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करून पत्नी राजश्री आणि आरोपी रंगाला अटक केली आहे. तर प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे.

मुलीने सांगितली सगळी हकिकत
भरतची 12 वर्षांची मुलगी श्रेयाने पोलिसांना सांगितले की, आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले. जिथे तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा भाऊ रंगाने भरतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटली आणि यकृताचे खूप नुकसान झाले, यातच भरत यांचा पुढे मृत्यू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.