Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?
 

'अखियों से गोली मारे' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्यात मतभेद असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यात गेले काही वर्ष सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलं. सुनीताच्या प्रत्येक मुलाखतीत ती गोविंदापासून कधीच दुरावल्याचं तिने सांगितलं. या सगळ्यासाठी गोविंदा आणि त्याच्या सोबतची माणसं जबाबदार असल्याचं ती म्हणाली. आता सुनीताने अखेर गोविंदापासून वेगळं होण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. तसेच तिने गोविंदावर अनेक आरोप केलेलं आहेत.

 
हाउटरफ्लायने दिलेल्या माहितीनुसार सुनिताने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिने गोविंदावर 'प्रेम आणि विवाहात फसवणूक, दुखावणे आणि वेगळे राहण्याच्या आधारावर घटस्फोट मागितला आहे. सुनिता अहूजाने हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 13 (1) (i), (ia), (ib) अंतर्गत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. कोर्टाने 25 मे रोजी गोविंदाला समन्स पाठवले होते आणि जूनपासून दोघेही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनावणीदरम्यान सुनीता वेळेवर कोर्टात हजर राहत आहे, तर गोविंदा गैरहजर राहिला आहे.

हे ठरलं कारण?
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्यात वाद होत असल्याचं समोर आलं होतं. त्याचं कारण एक मराठी अभिनेत्री असल्याचं सांगण्यात येतंय. गोविंदा एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सुनीताने कोर्टात अर्ज केल्याचं सांगण्यात येतंय. यासोबतच त्यांच्यातील सततचे मतभेद आणि वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे यामुळेही ते वेगळे होत असल्याचं म्हटलं जातंय. यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सुनीता एका मंदिरात बसली होती. तिथे ती रडताना दिसली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.