जर तुमच्याही आयुष्यात धनाशी संबंधित समस्या असतील तर वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्त्रोत असतो. तेथूनच दोन्ही प्रकारची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत असते, नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. धनहानी होऊ शकते, आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा घरात प्रवेश होण्यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तांब्याचा सूर्य – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर ताब्यांच्या सूर्याची प्रतिकृती लावणं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या घरातील पैशांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो, आणि घरातील वातावरण प्रसन्न राहातं, सोबतच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात.गणपतीची मूर्ती – घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीची मूर्ती लावणं वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हणतात. जर तुमच्या दरवाजावर गणपतीची मूर्ती असेल तर तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट हे दरवाजातूनच माघारी जातं. तुम्हाला आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाही.शमीचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजा जवळ शमीचं झाडं लावणं देखील शुभ मानलं जातं. या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहातो आणि आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाहीत.स्वस्तिकचं चिन्ह – हिंदू धर्माशास्त्रामध्ये स्वस्तिकच्या चिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वस्तिकचं चिन्ह शुभ मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजाला स्वस्तिकचं चिन्ह लावल्यास घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. घरावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं, असं मानलं जातं.
या चुका करू नका
घराच्या मुख्य दरवाजा जवळ कधीच चप्पल, बूट सोडू नका, घराचा मुख्य दरवाजा जिथे आहे, तो भाग कधीच आंधारात ठेवू नका. घराच्या दरवाजावर बल्ब लावावा. तसेच घराच्या मुख्य दरवाजाजवळ कधीच कचऱ्याची बाधली ठेवू नये.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.