Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पोलिसांची 'ती' मागणी पूर्ण न केल्याने सावली बारवर छापा', रामदास कदमांचा खळबळजनक दावा

'पोलिसांची 'ती' मागणी पूर्ण न केल्याने सावली बारवर छापा', रामदास कदमांचा खळबळजनक दावा
 

मुंबईतील सावली बारवर छापा मारत पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 22 मुलींसह 22 ग्राहकांना अटक करण्यात आली होती. तर हा डान्सबार राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असल्याची धक्कादायक समोर आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी याबाबत अधिवेशनात गंभीर आरोप केले होते. यानंतर कदम यांची अडचणी वाढल्या होत्या. आता या डान्सबारचे परमिट परत करण्यात आले आहे. अशातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी, योगेश कदम यांनी बारवरील केलेल्या कारवाईवरून काही पोलिस अधिकाऱ्यांचे फोन आले होते. त्यांनी कारवाई करू नये अशी विनंती केली होती. मात्र योगेश ऐकले नाहीत. त्यामुळेच पोलिसांनी सावली बारवर छापा मारला. आमची बदनामीचं कारस्थान रचलं असा दावा केला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.

कदम यांनी, योगेश कदमांची बदनामी करण्यासाठीच सावली प्रकरण जाणीवपूर्वक घडवून आणले गेले, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता लेडीज बार बंद न करण्यासाठी पोलिसांनीच चक्क गृहराज्यमंत्र्यांवर दबाव आणल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. दरम्यान त्यांनी, कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बारवरून गंभीर आरोप करणाऱ्या अनिल परब यांचा देखील त्यांनी समाचार घेतला.

कदम म्हणाले, सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत. शिवाय ते राजीनामा मागणारे कोण? आम्ही या आधीच या मागणी माहिती आणि सत्य समोर ठेवले आहे. त्या बारबाबत ऍग्रिमेंटही समोर ठेवले होते. ज्यात शरद शेट्टी या माणसाला तो चालवण्यासाठी दिल्याचे नमुद आहे. तसेच तेथे कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. तर काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील, त्याची मालकाची जबाबदारी असणार नाही, हे देखील त्यात नमुद आहे. त्या प्रमाणे हे प्रकरण उघडकीस येताच करार रद्द करण्यात आला.
राजीनाम्याचा विषयच येत नाही

दरम्यान, बारचे परमिट 13 तारखेलाच जमा केले असून हा विषय परब यांनी 18 ला विधिमंडळात विषय काढला. या हॉटेलचा आणि गृहराज्यमंत्री यांचा काहीही संबंध नाही. शिवाय राजीनाम्याचा विषयच येत नाही. परब हे दिशाभूल करत असून ते अर्धवट वकील आहेत, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.