Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'लवकरच, मी मंत्री होणार!', भास्कर जाधवांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!

'लवकरच, मी मंत्री होणार!', भास्कर जाधवांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!
 

राज्याच्या राजकारण सध्या अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकसात दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट घेतली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा ते दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांची सहकुटूंब भेट घेतली. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी देखील जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. अशातच राज्यातील महायुतीचे सरकार पडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी देखील, लवकरच मी मंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भास्कर जाधव ठाकरेंना सोडणार की राज्यातील सरकारच पडणार असे प्रश्न अनेकांच्या पडतान दिसत आहे.

राज्यात सध्या आगामी स्थानिकच्या तोंडावर महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. त्यासाठी बैठका आणि मेळावे घेतले जात आहेत. दरम्यान महत्वाचे नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी पक्ष प्रवेश देखील केले जात आहेत. कोकणात देखील सध्या ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात महायुतीत प्रवेश होताना दिसत आहेत. येथे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत शिवसेना फोडताना दिसत आहेत.

नुकसात उदय सामंत, योगेश कदम आणि माजी मंत्री रामदार कदम यांनी आपले पुढचे टार्गेट हे गुहागर असेल असे संकेत दिले असून तेथे शिवसेनेचा झेंडा फडकवू असा दावा केला आहे. तर येथे भास्कर जाधव यांचे जवळचे पदाधिकारी फोडले जात आहेत. अशातच भास्कर जाधव यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वत्र चर्चा होत असून त्यांनी, लवकरच राज्यात आपलं सरकार येणार असून मी मंत्री होणार असा दावा केला आहे. तसेच त्यांनी, मी मंत्री झालो नाही, तर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नक्की होईन, असेही म्हटले आहे. त्यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहेत. येथे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असून गळती थांबवण्याच्या उद्देशाने भास्कर जाधव यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांनी, रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना, रामदास कदम म्हणजे 'बामदास छमछम' असे असल्याचे ते म्हणाले. रामदास कदम यांनी, विधानसभेला आपल्या सभा जाधव यांच्या मतदारसंघात लागल्या नाहीत. अन्यथा जाधव 20 हजारांनी झोपला असता अशी टीका केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.