Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अत्यंत साधे राहणीमान..! 'हे' जिल्हाधिकारी सायकलवर जातात कार्यालयात

अत्यंत साधे राहणीमान..! 'हे' जिल्हाधिकारी सायकलवर जातात कार्यालयात
 

जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी म्हटलं की एसी गाडी, सुरक्षारक्षक, मागे अधिकाऱ्यांची फौज असा तामझाम असतो. पण एक जिल्हाधिकारी त्याला अपवाद आहेत.

सतीश कुमार एस.

डॉ. सतीश कुमार एस हे अनेकदा सायकलवर ऑफिसला जातात.
अत्यंत साधी राहणीमान असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची आगळीवेगळी स्टाईल जनतेच्या मनात भरली आहे.

कुठे आहेत?

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी आहेत. ता. २८ जानेवारीला त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

मुळचे तमिळनाडूचे

मुळचे तमिळनाडू येथील असून मद्रास मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे. पण डॉक्टरकी सोडून त्यांनी आयएएससाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

 
2013 पासून आयएएस

2013 मध्ये युपीएससी परीक्षेत यश मिळत ते आयएएस बनले. शाळेत असल्यापासूनच त्यांना प्रशासकीय सेवेचे आकर्षण होते. वडिलांसोबत ते जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी जात असत.

सायकलस्वारी

डॉ. सतीश यांना सायकलवरून प्रवास करणे खूप आवडते. त्यामुळे ते दररोज सायकवरूनच ते अनेकदा आपले कार्यालय गाठतात. त्यांच्यासोबत असलेला एक सुरक्षारक्षकही सायकवरच असतो.

काय कारण?

डॉ. सतीश यांच्या म्हणण्यानुसार, सायकल चालविल्याने व्यायाम होतो. हवेचे प्रदुषण होत नाही, इंधनाची बचत होते. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यही चांगले राहते.

नागरिकांमध्ये लोकप्रिय

मध्य प्रदेशात त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर सेवा केली आहे. संवेदनशीलता, शिस्तप्रिय आणि कामातील तत्परतेमुळे ते नागरिकांमध्येही लोकप्रिय आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.