Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! जगातील या बलाढ्य देशातील अर्ध्या लष्कराला एड्स, राष्ट्रप्रमुख टेन्शनमध्ये; जग हादरले

Big Breaking! जगातील या बलाढ्य देशातील अर्ध्या लष्कराला एड्स, राष्ट्रप्रमुख टेन्शनमध्ये; जग हादरले
 

रशिया आणि युक्रेन युद्धाला आता साडेतीन वर्षे झाली आहेत. हे युद्ध अजूनही सुरूच आहे. दोन्ही देशात शांतता करार करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याला अद्याप यश आलेले नाही. रशियाच्या लष्करात HIV आणि हेपिटायटिसच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  कीव इंडिपेंडेंटने याविषयीचे वृत्त दिले आहे. स्वतंत्र संशोधन संस्था कार्नेगी पोलिटिका यांच्या अहवाला आधारे हे वृत्त देण्यात आले आहे. त्यामुळे पुतिन यांचे टेन्शन वाढले आहे.

HIV चा धोका 13 पटीने वाढला
या अहवालानुसार, रशियन लष्करात 2022 मध्ये एचआयव्हीचा धोका 13 पटीने वाढला आहे. 2023 मध्ये तर हा धोका कित्येक पटीने वाढला. त्यातच युद्ध मैदानात अनेकांना याच सैनिकांचे रक्त चढवण्यात आले. इंजेक्शनचा सुरक्षित वापर करण्यात आला नाही. राखीव सैनिकांमधील व्यसनाचे प्रमाण आणि असुरक्षित शारिरीक संबंधामुळे गेल्या दोन वर्षांत एचआयव्ही मोठ्या प्रमाणात बळावल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
 
सरकारने त्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष

रशियाच्या कायद्यानुसार, एचआयव्ही, टीबी,हेपेटायटिजने पीडित लोकांची सैन्यात भरता करता येत नाही. पण युक्रेन युद्धामुळे रशियाने अटी आणि शर्ती झुगारल्या आणि मोठी लष्कर भरती केली. त्याविषयी अनेकांनी आक्षेप घेतला. ही अनफीट माणसं लष्करात घेऊन संकट ओढावून घेत असल्याचे बजावले. पण त्याकडे मास्कोने दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर रशियन लष्कराने तुरुंगातील अनेक कैद्यांना आणि निर्वासितांना सु्द्धा भरती केले. त्यांना महिन्याला 2,00,000 रुबल म्हणजे 2 लाख रुपये प्रति महिना देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांची भरती करण्यात आली. ही गुन्हेगार मंडळी आता व्यसनाधीन झाली आहेत. त्यांच्या असुरक्षित शारीरिक संबंधांमुळे एचआयव्हीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

हे तर रोग्यांचे लष्कर
पत्रकार ओल्गा रोमानोवा यांनी पुतिन यांच्या धोरणांवर टीका केली आहे. पुतिन यांनी रोग्यांचे लष्कर उभारल्याचा आरोप त्यांनी केला. हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि विविध व्याधींनी ग्रस्त सैनिक मरण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेने पण मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, रशियाने 2024 च्या अखेरीस टीबी आणि हेपिटायटिज सैनिकांची एक विशेष तुकडी तयार केली आहे. त्यांना मोठा हुद्दा आणि वेतन देत थेट युक्रेनच्या यु्द्धात उतरवण्यात आले. रशियाने गेल्या तीन वर्षांत जी 2.5 लाखांची फौज उभारली. त्यातील 40 टक्क्यांहून अधिक लोक ही HIV आणि विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. रोजच्या दगदगीनेच ही मंडळी गारद होत असल्याचा युक्रेनचा दावा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.