निंबळक : तुरची (ता. तासगाव) येथील सरपंच विकास डावरे यांनी मागील वर्षभरापासून स्वतंत्र तलाठी मिळण्यासाठी मागणी केली आहे. परंतु अकरा महिने होऊनही त्याबाबत कार्यवाही झाली नसल्याने सरपंच डावरे यांनी 'गाढवांची पूजा' करून त्याच्यासमोर असलेल्या मागणीचे निवेदन वाचून दाखवले. तुरची येथे स्वतंत्र तलाठी नसल्याने गावातील नागरिकांना दाखले आणि इतर कागदपत्रे यासाठी तलाठी यांना नेमून दिलेल्या तीन-चार गावापैकी कोणत्या तरी गावात शोध घेऊन काम करून घ्यावे लागत असल्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी सरपंच डावरे यांनी मागील वर्षी निवेदन दिले होते. परंतु आजअखेर कार्यवाही झाली नसल्याचे सरपंच डावरे यांनी सांगितले. त्यांनी गाढवांसमोर नारळ फोडून अगरबत्ती लावून त्यांच्याशी संवाद साधत निवेदन वाचून, स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.