विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच निवडणूक आयोगावर मतदार यादीतील अनियमिततेचे गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस सध्या बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अलीकडेच
विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेतली होती. मुख्य निवडणूक
आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या या पत्रकार परिषदेबाबत व्होट व्हायबने एक
सर्वेक्षण केले होते.
व्होट व्हायबने केलेल्या सर्वेक्षणात, लोकांना निवडणूक आयोगावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबद्दल, या संपूर्ण मुद्द्यावर त्यांचे काय मत आहे असे प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये, ३४ टक्के लोकांनी विरोधकांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले, तर २८ टक्के लोकांचे मत आहे की निवडणूक आयोग उत्तरे देण्यात अपयशी ठरला आहे.
व्होट व्हायबच्या सर्वेक्षणातून काय समोर आले?
सर्वेक्षणानुसार, १८ टक्के लोकांचे मत आहे की काही उत्तरे देण्यात आली आहेत, तर काही प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्याच वेळी, २० टक्के लोकांनी सांगितले की ते काहीही बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, फक्त ३४ टक्के लोक निवडणूक आयोगाच्या बाजूने आहेत, तर एकूण ४६ टक्के लोक निवडणूक आयोगावर अजिबात समाधानी नाहीत किंवा पूर्णपणे त्यांच्या बाजूने नाहीत.
सी व्होटरच्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी समोर
सी व्होटरने अलीकडेच या मुद्द्यावर एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये, ५९ टक्के लोक राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांशी सहमत आहेत, तर ३४ टक्के लोक निवडणूक आयोगाच्या समर्थनात दिसून आले. त्याच वेळी, ६७ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, तर १३ टक्के लोक यावर सहमत नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.