Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने पुण्यात खळबळ; हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेह; बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये नेमके काय घडले?

डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने पुण्यात खळबळ; हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेह; बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये नेमके काय घडले?
 

पुणे: शहरातील प्रसिद्ध बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात एका तरुण डॉक्टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 23 वर्षीय ज्योती कृष्णकुमार मीना (रा. राजस्थान) हिने मध्यरात्रीच्या सुमारास वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आयुष्य संपवले. घटनेची माहिती तेव्हा समोर आली, जेव्हा ज्योतीच्या मैत्रिणींना संशय आल्याने त्यांनी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तातडीने महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडल्यानंतर ज्योती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही, त्यामुळे मृत्यूचे गूढ अधिक वाढले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी ज्योतीच्या कुटुंबीयांना संपर्क साधला असून ते पुण्याकडे रवाना झाले आहेत. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालय आणि शहरातील शिक्षण वर्तुळात शोककळा पसरली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.