कृष्णा-कोयना-वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:30वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 39 फूट इतकी आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे.
मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी आज रात्रीपासून वाढत जाऊन उद्या दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी 42 फूट ते 43 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले आहे. आज धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना – 95300, धोम – 9862, कन्हेर – 10468, उरमोडी – 4367, तारळी – 3085, वारणा – 34257. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.