Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षिकेनं लेकीसह स्वत:ला पेटवून घेतलं; पती अन् मित्राकडून शारीरिक छळ, सुसाईड नोटही सापडली

शिक्षिकेनं लेकीसह स्वत:ला पेटवून घेतलं; पती अन् मित्राकडून शारीरिक छळ, सुसाईड नोटही सापडली
 

ग्रेटर नोएडाच्या निक्की हत्याकांडानंतर राजस्थानमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. जोधपूरमधील पीडित महिलेनं सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं. नंतर निष्पाप मुलीलाही पेटवून घेतलं. यात दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पीडित महिला आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

पोलिसांना तपासात एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. संजू बिश्नोई असं मृत महिलेचं नाव आहे. ती शिक्षिका होती. ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियवास पोलीस स्टेशन हद्दीतील सरनाडा गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतली. तिनं लेकीला जवळ घेतलं. अंगावर पेट्रोल ओतून घेतलं.
 
 
त्यानंतर तिनं स्वत:ला पेटवून घेतलं. यात मुलगीही भाजली गेली. घटनेच्या दिवशी पती, सासू -सासरे घरी उपस्थित नव्हते. परिसरातील नागरिकांनी धूर पाहून कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घराच्या दिशेनं धाव घेतली. तसेच संजू आणि चिमुकलीला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर, पीडित महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह पीडितेच्या घरच्यांना दिला. पीडितेच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती दिलीप बिश्नोई, सासू आणि सासऱ्यांविरोधात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला. 
 
पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं तिच्या सुसाईड नोटमध्ये पती, सासू, सासरे आणि नणंदेवर छळाचा आरोप केला आहे. यासह तिनं गणपत सिंग नावाच्या व्यक्तीवरही छळाचा आरोप केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत सिंग आणि महिलेचा पती मिळून तिचा शारीरिक छळ करत होते. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.