आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी ३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. ३ आयएएस अधिकार्यांमध्ये अनुक्रमे अजित कुंभार, तृप्ती धोडमिसे, विशाल नरवडे यांच्या नावांचा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी योगेश कुंभजेकर, वर्षा मीना, संजय चव्हाण, भुवनेश्वरी एस., रघुनाथ गावडे या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
आज कुणाची कुठे नियुक्ती?
अजित कुंभार (IAS:RR:2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDC) मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (IAS:RR:2019) यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. विशाल नरवडे (IAS:RR:2020) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सांगली जिल्हा परिषद येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून काही अधिकाऱ्यांना पदोन्नती
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. अलिबाग माहिती कार्यालयातील किरण रामकुष्ण वाघ यांची मुंबईतील माहिती विभाग मुख्यालयात वरिष्ठ सहायक संचालक नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मंगेश वरकड यांची वर्ध्यात माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील शैलजा वाघ दांदळे यांची भंडारा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश येसनकर यांची चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिजकिशोर झंवर यांची मुंबईत वरिष्ठ सहायक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.