कोल्हापूर : कळंबा येथील 'स्वप्नव्हिला' फार्म हाऊसच्या नावाआड सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्याचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला. गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पोलिसांनी मुख्य महिला एजंटसह तिघांना अटक करत सहा पीडित महिलांची सुटका केली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे
यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी मुख्य सूत्रधार
फातिमा विजय देसाई (33, रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड), राहुल
सुरेश लोहार (33, रा. पेठवडगाव), परशुराम चवंडू पाटील (45, रा. मलतवाडी,
ता. चंदगड) या तिघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
केला आहे. त्यात फार्म हाऊसचा मालक संदीप अनिलराव कदम याचाही समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.