कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू करण्याबाबत शुक्रवारी राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. १८ ऑगस्ट पासून हे काम कोल्हापुरात सुरू होणार आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षकारांना न्याय लवकर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हा निर्णय करताना कोल्हापुरातील सामान्य जनतेने आनंद व्यक्त केला. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ , सर्किट बेंच कोल्हापूर मध्ये स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चार दशकापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग येथील वकील खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी योग्य स्थिती उपलब्ध आहे. यासंबंधीचे सादरीकरण खंडपीठ कृती समितीचे निमंत्रकासह सहा जिल्ह्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशासमोर सादरीकरण केले. न्यायाधीशांनी याप्रश्नी अभ्यास करून निर्णय देण्यात येईल असे आश्वत केले होते. सर्किट बेंच स्थापण्याच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाल्याचे कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत यांनी म्हटले आहे.
प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. चंदुरकर, एम. एस. सोनक, रेवती मोहिते-ढेरे पाटील,. रविंद्र व्ही. घुगे यांचे सोबत खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.ॲड. सर्जेराव खोत, ॲड संतोष शहा, ॲड. संग्राम देसाई यांनी कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन करण्याकरिता असणारे अत्यंत पूरक वातावरण कसे आहे याविषयी माहिती नुकतीच दिली होती. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली होती.लोकप्रतिनिधी आणि खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य शासन सकारात्मक आहे, असे सांगितले होते. त्यांनी दीपांकर दत्ता यांना यांना ८ मार्च रोजी पत्र पाठविले होते. त्यानंतर पुढचे पावूल टाकत ठाकरे यांनी दीपांकर दत्ता यांची भेट घेतली असता याप्रश्नी कोल्हापूर खंडपीठाविषयी सकारात्मक चर्चा केली होती.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील अधिकार क्षेत्राचा वापर करण्याकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. नियमित खंडपीठाची स्थापना होईपर्यंत सर्किट बेंच स्थापन व्हावे, अशीही मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील आजचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी सातत्याने लावून धरली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.