Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली, दरीत कोसळली; 10 महिलांचा मृत्यू, आमदारांची रुग्णालयात धाव

Breaking News ! डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली, दरीत कोसळली; 10 महिलांचा मृत्यू, आमदारांची रुग्णालयात धाव
 

पुणे : जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 10 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात 10 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. गावातील शेतकरी महिला श्रावण सोमवारनिमित्ताने देवदर्शनासाठी निघाल्या असता ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.

खेड जवळील लगतच्या गावातील 25 ते 30 प्रवासी ज्यामध्ये महिला आणि लहानगी मुलेही होती, हे सर्वजण कुंडेश्वर मंदिरात दर्शनाला निघाले होते. तिसरा श्रावणी सोमवार असल्यानं इथं भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, देवदर्शनासाठी निघालेल्या या महिलांवर काळाने घाला घातला. मंदिराकडे जाणाऱ्या नागमोडी वळणाने वरती येत असताना, प्रवाशांनी भरलेली पिकअप अचानकपणे रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत, दरीत कोसळली. या दुर्घटनेत 20 महिला आणि लहान मुलं गंभीर जखमी झाल आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे आत्तापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झालाय. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णालयात धाव घेत घटनेची व परिस्थितीची माहिती घेतली. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं होतं. मात्र, प्रशासनाकडून लवकर रुग्णवाहिका व मदत न मिळाल्याने काही भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
10 ते 12 महिला दगावल्या - आ. काळे

दरम्यान, या घटनेनं खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस प्रशासन व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जशा रुग्णवाहिका भेटल्या, खासगी वाहनं भेटली तशी जखमींना जवळील खासगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी केली. या दुर्घटनेत 8 ते 9 महिला दगावल्याची माहिती आहे, असे आमदार काळे यांनी सांगितले.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.