अंबानींच्या 'वनतारा'त प्राणी कुठून येतात? गुजरातमधील जामनगरचा गाजलेला प्राणीप्रकल्प अडचणीत! SC नं स्थापन केलं विशेष चौकशी पथक
नवी दिल्ली : गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात असलेल्या वनतारा वन्यजीव मदतकेंद्राच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
न्या. चेलमेश्वर हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. रिलायन्स फौंडेशनचे आर्थिक पाठबळ असलेले 'वनतारा' हे ३५०० एकर परिसरात उभारले आहे. याच वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'वनतारा'चे उद्घाटन झाले होते. या केंद्रामध्ये अनैतिक पद्धतीने वन्यप्राण्यांना आणले जात असल्याचा आरोप आहे.यासंदर्भात न्यायालयात अनेक याचिका आणि तक्रारी दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राघवेंद्र चौहान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिश गुप्ता यांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.