Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

12वी पास आहात का? तब्बल 7565 जागांवर नवीन मेगाभरती, पगार 69100 पर्यंत

12वी पास आहात का? तब्बल 7565 जागांवर नवीन मेगाभरती, पगार 69100 पर्यंत
 

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२५ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. बारावी उत्तीर्ण असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑक्टोबर आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार भरतीसाठी पात्र आहेत. या भरतीद्वारे ७,५६५ रिक्त जागा भरल्या जातील. ज्यामध्ये ५,०६९ पुरुष आणि २,४९६ महिलांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकते?

शैक्षणिक पात्रता म्हणून किमान 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 1 जुलै 2025 रोजी 18 ते 25 वर्षे आहे, सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणींसाठी वयात सूट आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
कशी होणार निवड?

दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२५ साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, लेखी परीक्षा घेतली जाईल. ही लेखी परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) असेल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल.
वेतनश्रेणी : निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-३ वेतनश्रेणी ₹२१,७००-₹६९,१०० पगार मिळेल.

अर्ज शुल्क

जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.